ॲड. ज्योत्स्ना काताळकर यांची कुटगिरी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड

ॲड. ज्योत्स्ना काताळकर यांची कुटगिरी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड

उपशीर्षक : सामाजिक सलोखा, शांतता आणि गावातील तंटे सामंजस्याने सोडविण्याच्या कार्याची ग्रामस्थांकडून दखल

गुहागर (प्रतिनिधी : मंगेश जाधव) : गुहागर तालुक्यातील मौजे कुटगिरी-पाती येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी स्व. बाळासाहेब खेतले प्रतिष्ठानच्या कुटगिरी गावच्या सल्लागार ॲड. ज्योत्स्ना विनय काताळकर यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

गावातील सामाजिक सलोखा, शांतता आणि एकोपा कायम राखण्यासाठी तसेच गावातील विविध तंटे सामंजस्याने सोडविण्यासाठी ॲड. ज्योत्स्ना काताळकर यांनी यापूर्वीही उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत ग्रामस्थांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास व्यक्त करून तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.

गावातील विविध प्रश्न आणि तंटे संवादातून व सामंजस्याने सोडविण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्यामुळे त्यांच्या दुसऱ्यांदा झालेल्या बिनविरोध निवडीचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येत आहे.

या निवडीबद्दल स्व. बाळासाहेब खेतले प्रतिष्ठानच्या वतीने तसेच कुटगिरी-पाती ग्रामस्थांकडून ॲड. ज्योत्स्ना विनय काताळकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें