*वसुधा फाउंडेशनतर्फे बालकवी संमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळा*

पुणे (गुरुदत्त वाकदेकर) : वसुधा फाउंडेशनच्या वतीने रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी अक्षरवेल सभागृह, लोकमान्य वाचनालयाजवळ, चाफेकर रस्ता, रामबाग कॉलनी, सदाशिव पेठ, पुणे येथे बालकवी संमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री व बालसाहित्यिका ललिता श्रीपाल सबनीस होत्या. फाउंडेशनच्या संस्थापिका वसुधा वैभव नाईक यांनी स्वागत केले.
यावेळी ‘आपडी थापडी’ या बालकाव्यसंग्रहाचे आणि ‘वसुधाचे कथा वैभव’ या कथासंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला वकील तथा माजी पोलीस निरीक्षक अब्दुल शेख, दिग्दर्शक पुंडलिक धुमाळ, कवी व राष्ट्रपती पोलिस पदक विजेते सिताराम नरके, शिक्षक काळुराम वाघचौरे, निसर्गकवी लक्ष्मण शिंदे आणि तितिक्षा भावार्थच्या प्रिया प्रमोद दामले यांची प्रमुख उपस्थिती होती. बालकवींना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मान्यवरांनी फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले.
विविध शाळांमधून सहभागी झालेल्या बालकवींनी संमेलनात कविता सादर केल्या. एम्.अजया , आर्या ढोके, अस्मिता सचिन रांजणे, अनुष्का सुरेश लाऊ, ईशिका योगेश दोडमणी, ईश्वरी बाळासाहेब खोपडे, गायत्री रसाळ, प्रांजल रोहिदास मोरे, पार्थ श्रीराम घडे, मंदार शेखर भोंडवे, माधुरी गिरी, मृणाल प्रदीप ताम्हाणे आणि मृण्मयी काळे यांनी कविता सादर केल्या. युवराज मोरे, राधिका सोनवणे, रूपाली चव्हाण, वेदिका दीपक सावंत, वीरा संदीप दरेकर, संस्कृती नवनाथ खुटवड, सारिका गणेश सोंडकर, सिद्धी नितीन बिडकर, स्वरा सुशील यादव, श्रावणी लोहार, श्रावणी नितीनकुमार गुरव आणि श्रीराम विठ्ठल पवार यांनीही कविता सादर केल्या. निसर्ग, समाज, शिक्षण आणि संस्कार अशा विविध विषयांवरील कवितांना उपस्थितांनी दाद दिली.
पुणे विद्यार्थी गृह, सदाशिव पेठ महाराष्ट्र विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देगाव, मुकुंदराव आठवले माध्यमिक विद्यालय, माळेगाव तसेच स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, उरुळी कांचन येथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसह सहभाग नोंदविला. पालक प्रतिनिधी प्रिया दामले, आदर्श शिक्षक महेंद्र सावंत, शिक्षक विक्रम कदम आणि शिक्षिका वंदना ढोले यांनीही उपस्थिती लावली. निसर्गकवी लक्ष्मण शिंदे यांनी ‘झाडाची आरती’ ही कविता सादर केली.
अध्यक्षीय मनोगतात ललिता सबनीस यांनी बालकवींच्या सादरीकरणाचे कौतुक केले. या मुलांमधून भविष्यात अनेक उत्तम बालकवी घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी गौरव पुंडे यांनी राजयुवा प्रकाशनाच्या कार्याचा आढावा घेतला.
कार्यक्रमाचे नियोजन योगेश हरणे यांनी केले. आयोजनात गौरव पुंडे, कोमल नाईक, शीतल शर्मा, श्रीराम घडे, सायली ढेबे, मयुरी पुंडे आणि राधिका परदेशी यांनी सहकार्य केले. निवेदक गजानन उपाडे यांनी सूत्रसंचालन केले. बालसाहित्याला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाचे प्रमुख पाहुण्यांनी कौतुक करून वसुधा फाउंडेशनच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.









