सुर्या ग्रुप संघटनेतर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

*सुर्या ग्रुप संघटनेतर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्यातील सुर्या ग्रुप संघटना, मोहितेवाडी – तांबे वाडी, खोडदे यांच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला “विद्यार्थी गुणगौरव सोहळा – २०२६” मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यास वाडीतील मान्यवर, महिला मंडळ,तसेच सर्व ग्रामस्थ, विद्यार्थी बहसंख्येने उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावे, त्यांच्यामध्ये शैक्षणिक आवड निर्माण व्हावी आणि गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने गेल्या १३ वर्षांपासून जपली जाणारी ही आधुनिक परंपरा यावर्षीही त्याच उत्साहाने पुढे नेण्यात आली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कार्यसेवकांनी आपला बहुमूल्य वेळ देत अथक परिश्रम घेतले.

संघटनेने दिलेली “साद” आणि वाडीतील सन्माननीय देणगीदारांनी दिलेला “हात आणि दाखवलेला विश्वास” यामुळे हा सामाजिक व शैक्षणिक उपक्रम यशस्वीपणे उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.

यावेळी देणगीदारांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या लकी ड्रॉ उपक्रमालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देणगीदारांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या उपक्रमा मध्ये वैभव गणपत तांबे यांनी आपल्या अनोख्या शैलीत कार्यक्रमातील उत्साहात आणखी भर पाडली.“संघटना आणि काळ पुढे जात असताना त्यातून शिकणे, झालेल्या चुका सुधारण्याचा सातत्याने प्रयत्न करणे आणि भविष्यात आणखी चांगले करण्यासाठी एकत्रितपणे पुढे जाणे” या विचारधारेने सुर्या ग्रुप संघटना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य दिलीप मोहिते आणि महेश शांताराम मोहिते यांनी केले.यावेळी सर्व विद्यार्थी, पालक, देणगीदार, मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, कार्यसेवक आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळे “विद्यार्थी गुणगौरव सोहळा – २०२६” यशस्वीपणे संपन्न झाला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें