राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती; जिल्ह्यातील ३ तालुक्यांचा समावेश

*राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती; जिल्ह्यातील ३ तालुक्यांचा समावेश

 

*दुष्काळ परिस्थिती निश्चित करणारी प्रथम कळ लागू,यात रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर चा समावेश

 

*समिर शिरवडकर- रत्नागिरी

 

*रत्नागिरी :- महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार, सन २०२६ च्या खरीप हंगामात पावसाची तूट आणि इतर घटकांमुळे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती निश्चित करणारी ‘प्रथम कळ’ (Trigger-1) लागू करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर या ३ तालुक्यांचा यात समावेश आहे.

शासन निर्णयातील परिशिष्ट-१ नुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील खालील ३ तालुक्यांमध्ये Trigger-1 लागू झाला आहे:

* रत्नागिरी

* संगमेश्वर

* राजापूर

प्रत्यक्ष पंचनामे आणि सर्वेक्षणाचे तात्काळ आदेश

शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना या बाधित तालुक्यांमध्ये तातडीने पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत:

* तातडीने पंचनामे: संबंधित तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष पंचनाम्यांचे काम विनाविलंब सुरू करण्यात यावे.

* डिजिटल पुरावे: सर्व्हेक्षण केलेल्या भागातील पिकांची खरी स्थिती दर्शवणारे छायाचित्रे (Photos) व जीपीएस कोऑर्डिनेट्स (GPS Coordinates) गोळा करण्यात यावेत.

* अहवाल सादरीकरण: पीक परिस्थितीचा हा वस्तुनिष्ठ अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाकडे तात्काळ सादर करावा.

शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या १२ प्रमुख सवलती

राज्यातील २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांसह रत्नागिरीतील या ३ तालुक्यांसाठी शासनाने पुढील सवलती लागू केल्या आहेत:

* कर्ज व महसूल सवलत: जमीन महसुलात पूर्ण सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित सर्व प्रकारच्या कर्ज वसुलीस तात्पुरती स्थगिती.

* वीज बिल माफी व जोडणी संरक्षण: ७.५ हॉर्सपावरपेक्षा जास्त क्षमतेच्या कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट देण्यात आली आहे (७.५ HP पर्यंतची बिले आधीच मोफत आहेत). तसेच शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज तोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

* विद्यार्थ्यांना दिलासा: बाधित भागातील सर्व शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले जाईल.

* रोहयो व पाणीपुरवठा: रोजगार हमी योजनेच्या (MGNREGA) कामांचे निकष शिथिल करून जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करणे आणि टंचाईग्रस्त भागात टँकरने पिण्याचे पाणी पुरवणे.

* इतर उपाययोजना: जनावरांसाठी आवश्यक चारा आणि पाण्याचे नियोजन करणे, अन्नधान्याची टंचाई भासू न देणे तसेच जलसंधारणाची कामे प्राधान्याने सुरू करणे.

बाधित शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पीक नुकसानीची आर्थिक भरपाई ही पंचनाम्यांची विहित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे घोषित केली जाईल.

 

*दुष्काळ परिस्थिती बाबतीत वरिष्ठांना कळीत केले आहे,मात्र अजूनही पंचनामे किंवा पाहणीचे आदेश नाहीत*

*शेंडे -सहाय्यक कृषी अधिकारी राजापूर*

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें