निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार रत्नागिरी जिल्हा संघटना आक्रमक राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांना पोलीस संरक्षण द्या आणि पत्रकार समाधान काबंळे यांच्या वरील जिवघेण्या हल्ल्याचा जाहीर निषेध

निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार रत्नागिरी जिल्हा संघटना आक्रमक राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांना पोलीस संरक्षण द्या आणि पत्रकार समाधान काबंळे यांच्या वरील जिवघेण्या हल्ल्याचा जाहीर निषेध

गुहागर (प्रतिनिधी )

पत्रकारांनी निर्भयपणे आपले कर्तव्य बजावता यावे यासाठी शासनाने कठोर भूमिका घेणे अत्यावश्यक असून पत्रकारावर हल्ला करणाऱ्या किंवा त्यांना धमकवणाऱ्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव अथवा हस्तक्षेप न स्वीकारता कायद्यानुसार कठोर कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ भारत रत्नागिरी जिल्हा संघटना आक्रमक झाली आहे संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मयुरेश अशोक भागवत यांनी गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक मा. अश्वनाथ खेडकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना निवेदन सादर केले आहे या निवेदनातील प्रमुख सहा

मागण्या पुढील प्रमाणे

१) निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश रामराव कचकलवार यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे

२) धमकी देणाऱ्यावर कठोर कारवाई करा: त्यांच्या जिवास धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तींची तातडीने चौकशी करून आवश्यक ती प्रतिबंधात्मक कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

३) जीव घेण्या हल्ल्याचा सखोल तपास करा: पत्रकार समाधान कांबळे(शेकापूर ता. माहूर)यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा सखोल व निष्पक्ष तपास करण्यात यावा.

४) सर्व आरोपींना तात्काळ अटक करा: हल्ल्यातील सर्व आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आले आहे

५) जिल्हा व तालुका स्तरावर सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी.

६) शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी: पत्रकारांना धमकी मारहाण अथवा धोका निर्माण करणाऱ्या घटनांची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित पोलीस प्रशासनाला द्यावेत.

पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकारांच्या सुरक्षेची तडजोड होणे म्हणजे लोकशाहीच्या सुरक्षेची तडजोड होणे होय त्यामुळे या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन वरील मागण्या वर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी करण्यात यावी अशी मागणी संघटनेने केली आहे.निवेदन सादर करताना निर्भय व ग्रामीण पत्रकार संघांचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष मयुरेश भागवत सल्लागार मंगेश जाधव सामाजिक कार्यकर्ते महेश शिगवण उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें