गुहागर: परचुरीतील ग्रामदैवत श्री भैरी वाघजाई मंदिरात चोरी; स्पिकर मशीन चोरणारा इसम सीसीटीव्हीत कैद

गुहागर: परचुरीतील ग्रामदैवत श्री भैरी वाघजाई मंदिरात चोरी; स्पिकर मशीन चोरणारा इसम सीसीटीव्हीत कैद

 

आहूजा कंपनीच्या ३२ हजारांच्या दोन अँम्लिफायरची चोरी; गुहागर पोलिसांत गुन्हा दाखल, परिसरात भीतीचे वातावरण

गुहागर (प्रतिनिधी – मंगेश जाधव):

गुहागर तालुक्यातील परचुरी येथील ग्रामदैवत श्री भैरी वाघजाई मंदिरातून अज्ञात चोरट्याने तब्बल ३२ हजार रुपये किमतीच्या ‘आहूजा’ कंपनीच्या दोन स्पिकर मशीन (अँम्लिफायर) चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी २६ सप्टेंबर रोजी रात्री ९.०५ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली असून, चोरीचा हा सर्व प्रकार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परचुरी परिसरात घबराटीचे व चिंतेचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबर रोजी सकाळी परचुरी गुरववाडीतील देवस्थानचे विश्वस्त संतोष कृष्णा पवार हे नित्यनियमानुसार मंदिरात पूजा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना मंदिरातील स्पिकरचे साहित्य दिसून आले नाही. त्यांनी तत्काळ मंदिर देवस्थानचे अध्यक्ष रामचंद्र आडविलकर व इतर विश्वस्तांना फोनवरून या चोरीची माहिती दिली. त्यानंतर देवस्थानचे खजिनदार सुचितानंद देर्देकर व ग्रामस्थांनी मंदिरात येऊन पाहणी केली असता, मंदिरातील आहूजा कंपनीचे दोन अँम्लिफायर गायब असल्याचे निदर्शनास आले.

संशय आल्याने मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये २६ सप्टेंबर रोजी रात्री ९.०५ ते ९.३० च्या दरम्यान एका अज्ञात इसमाने मंदिराच्या आवारात प्रवेश करून काळ्या रंगाचे दोन आहूजा कंपनीचे अँम्लिफायर चोरून नेल्याचे स्पष्ट दिसत आहे. या दोन्ही मशीनची एकूण किंमत सुमारे ३२ हजार रुपये आहे.

या प्रकरणी देवस्थानचे अध्यक्ष रामचंद्र आडविलकर यांनी गुहागर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून २७ सप्टेंबर रोजी रात्री ७.५९ वाजता गुन्हा रजिस्टर क्र. ९८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०५ (अ) अंतर्गत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीसीटीव्ही फुटेज आणि उपलब्ध माहितीच्या आधारे गुहागर पोलीस या अज्ञात चोरट्याचा वेगाने शोध घेत असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें