भाजपला रत्नागिरीत मोठा धक्का: १७ वर्षे निष्ठेने काम करणाऱ्या नंदकुमार बेंद्रे यांचा राजीनामा; पक्षांतर्गत नाराजी चे कारण

highlits

भाजपला रत्नागिरीत मोठा धक्का: १७ वर्षे निष्ठेने काम करणाऱ्या नंदकुमार बेंद्रे यांचा राजीनामा; पक्षांतर्गत नाराजी चे कारण

रत्नागिरी: भारतीय जनता पार्टीचे (भाजप) ज्येष्ठ कार्यकर्ते आणि ओबीसी मोर्चाचे माजी तालुका अध्यक्ष व जिल्हा सचिव नंदकुमार बारक्या बेंद्रे यांनी पक्षाच्या सर्व सदस्यत्वाचा आणि पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची होणारी उपेक्षा याला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे राजीनामा पत्रात नमूद केले आहे.

नंदकुमार बेंद्रे यांनी भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हा अध्यक्ष यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. राजीनामा पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, “गेली १७ वर्षे मी पक्षाचे अतिशय प्रामाणिकपणे काम केले आहे. पक्षाच्या पडत्या काळातही आम्ही कधी डगमगलो नाही आणि पक्षाने दिलेल्या विविध जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडल्या”.

मात्र, “ज्या वेळी पक्षाला चांगले दिवस आले, त्या वेळी मात्र प्रामाणिक लोकांना डावलले जात असल्याची माझी तीव्र भावना झाली आहे. पक्षातील वाढत्या अंतर्गत गटबाजीमुळे दुःखी होऊन मी माझ्या प्राथमिक सदस्यत्वाचा व पदाचा राजीनामा देत आहे,” असा गंभीर आरोप बेंद्रे यांनी केला आहे.

नंदकुमार बेंद्रे हे ‘कुणबी समाजोन्नती संघ’ (रत्नागिरी तालुका उपाध्यक्ष), ‘माहिती अधिकार फेडरेशन’ (रत्नागिरी दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष) आणि ‘एन जी ओ संपर्क युनिक फाउंडेशन’ (अध्यक्ष) यांसारख्या विविध सामाजिक संस्थांमध्येही सक्रिय आहेत. त्यांच्या या राजीनाम्यामुळे रत्नागिरीतील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून भाजपला स्थानिक पातळीवर मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ागनंदकुमार बेंद्रे यांनी आपल्या पदाचा राजीनामा रत्नागिरी भाजपा अध्यक्ष यांचे कडे पाठवले आहे. असे त्यांनी आमच्या प्रतिनिधी यांना सांगितले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें