रत्नागिरीत काँग्रेस आक्रमक! निवडणूक आयुक्तांवर कारवाई आणि दुष्काळ अनुदानासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

रत्नागिरीत काँग्रेस आक्रमक! निवडणूक आयुक्तांवर कारवाई आणि दुष्काळ अनुदानासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

महाराष्ट्र महिला काँग्रेस सरचिटणीस हुस्नबानू खलपे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे आंदोलन; दोषींवर चौकशीसह सरसकट अनुदानाची मागणी

रत्नागिरी: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित गैरकारभाराची स्वतंत्र चौकशी करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, त्यांनी घेतलेल्या वादग्रस्त निर्णयांना स्थगिती मिळावी आणि मतदार यादीतील संशयास्पद बदलांची निष्पक्ष चौकशी व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी आज रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यासोबतच रत्नागिरी जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना सरसकट अनुदान त्वरित मंजूर करावे, अशीही आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या सरचिटणीस तथा राजापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष हुस्नबानू खलपे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सोपवण्यात आले.

लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भूमिकेची चौकशी होणे गरजेचे असल्याचे काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले. तसेच, जिल्ह्यातील बळीराजा संकटात असताना प्रशासनाने तात्काळ मदतीचा हात देऊन रत्नागिरीला सरसकट अनुदान जाहीर करावे, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या आंदोलनाप्रसंगी रत्नागिरी शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ पदाधिकारी, जिल्हा, शहर व तालुकाध्यक्ष, तसेच पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, आजी-माजी नगरसेवक आणि नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


बातमीदार – अस्लम शेख 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें