पंचशिलेचा मार्ग अवलंबिल्यास जिवन सुखकर होते – ऍड. अशोकराव निकम

*पंचशिलेचा मार्ग अवलंबिल्यास जिवन सुखकर होते – ऍड. अशोकराव निकम

आबलोली (संदेश कदम)

या जगात दुःख आहे.दुःखावर उपाय आहे. दुःखाचे मूळ शोधून दुःखातून मुक्त होता येते. या देशात जन्माला आल्यानंतर मला कसे जगायचे आहे.याची परिपूर्ण माहिती तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपल्या धम्मात भिक्खू संघाला सांगितली आहे. विचारच माणसाचे जीवन घडवतात.यासाठी दुसऱ्याबद्दल वाईट चिंतायचे नाही. वाईट बोलायचे नाही. कुशल कर्मानेच माणूस घडतो. यासाठी बुद्धाच्या पंचशिलेचा मार्ग अवलंबिल्यास जीवन सुखकर होते असे स्पष्ट मत ऍड. अशोकराव निकम यांनी व्यक्त केले.

गुहागर तालुक्यातील आबलोली मधील आनंदवन बुद्ध विहार मौजे आबलोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे भारतीय बुद्ध शासन सभा तालुका गुहागर या धम्म संघटनेच्या वतीने वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऍड. अशोकराव निकम प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या वर्षावास कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर या धम्म संघटनेचे तालुका अध्यक्ष

अनंतराव मोहिते हे होते . यावेळी महामानवांच्या पुतळ्यांचे आणि प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन आणि दीपप्रज्वलन करून पुतळ्यांना आणि प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर बुद्ध पूजा पाठाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी ऍड. अशोकराव निकम मार्गदर्शन करतानापुढे म्हणाले की, सब्बे बुद्धास बिंबे.. अडीच हजार वर्षांपूर्वीपासून या देशात जाल तिथे बुद्ध दिसेल बुद्धाच्या मूर्ती दिसतील बुद्धाची बिंबे दिसतील बुद्धाची बसण्याची जागा दिसेल. आणि तिथे बसल्यानंतर या पवित्र जागेत भगवंतानी भिख्कू संघाला आदेश दिला आहे. तो पंचरंगी विभूतांनी न दिसणारा आदेश आहे. पहिल्या धम्मचक्र प्रवर्तनात भगवंतानी सांगितले. माणसाने सतत चालत राहिले पाहिजे. सिंह जसे चालतो, चालतो आणि चालताना दूरवर गेल्यावर थांबून मागे बघून सिंहालोकलन करतो. तसे तुम्हीही एका ठिकाणी थांबा आणि वर्षभर काय केलेत. त्याचा विचार करा. चिंतन,मनन करा. आपण समाजाला जे विचार दिले त्याच्यातून समाजाची अधोगती झाली की प्रगती झाली. ही समीक्षा करा.या देशात रक्ताचा एकही थेंब न सांगता सम्राट अशोकाने धम्मचक्र प्रवर्तन करून पहिली धम्म क्रांती घडविली. त्यानंतर बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 19 56 या दिवशी नागपूर येथे लाखो अनुयायांसहित धम्मदीक्षा घेऊन दुसरी धम्म क्रांती घडवली या प्रवाहात सरसकट बहुजन समाज सहभागी झाला होता. धम्माचे तीन प्रकार आहेत. मी बुद्धाला वंदन करतो, मी त्याच्या धम्माला वंदन करतो आणि मी त्याच्या संघाला वंदन करतो. आपल्या सर्वांचे कुशल मंगल होवो अशा शुभेच्छाही ऍड. अशोकराव निकम यांनी दिल्या.

यावेळी विचारपीठावर भारतीय बुद्ध सासन सभा या धम्म संघटनेचे तालुकाध्यक्ष अनंतराव मोहिते, ऍड. अशोकराव निकम, बौद्धजन सहकारी संघाचे माजी तालुकाध्यक्ष आप्पा कदम, भारतीय बुद्ध शासन सभा या धम्म संघटनेचे मार्गदर्शक काशिनाथ सुर्वे, प्रभाकर सुर्वे, दत्ताराम कदम, अशोक सुर्वे, शिवराम यादव, मधुकर यादव, सुधीर मोहिते, विलास मोहिते, विष्णू सावंत, महिला संघटनेच्या सौ. निर्मला मोहिते, माजी सरपंच अपर्णा रणपिसे, सौ. रुपाली सुर्वे,यशवंत यादव आदी. कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाला आबलोली, जांभारी, वेळंब – पांगरी, आंबेरे, मोंभार, असोरे, शिवणे, काजुर्ली गावठाण येथील धम्म बांधव, बंधू-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक काशिनाथ सुर्वे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रभाकर सुर्वे, वैभव कदम यांनी केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें