एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल आबलोलीच्या विद्यार्थ्यांची ज्युदो खेळात विभागस्तरावर निवड

*एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल आबलोलीच्या विद्यार्थ्यांची ज्युदो खेळात विभागस्तरावर निवड*
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल आबलोली
या शाळेतील इयत्ता 9वी मध्ये शिकत असलेला कुमार .आर्यन महेश मोहित 55 वजनी गट,इयत्ता 7 वी मध्ये शिकत असलेली कुमारी गार्गी देवेंद्र भोसले 44 किलो वजनी गट आणि इयत्ता 6 वी मधील सिया विशाल गोरीवले 27 किलो वजनी गट, या तिन्ही विद्यार्थ्याची कोल्हापूर येथे दिनांक 3 आणि 4 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विभाग स्तरीय ज्युदो स्पर्धे मध्ये निवड झाली आहे. हे सर्व विद्यार्थी ज्युदो कोच सोनाली वरंडे आणि तपस्विनी नाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहेत.
कोल्हापूर येथे होणाऱ्या विभाग स्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन बाईत आणि सेक्रेटरी सौ . स्नेहल सचिन बाईत यांनी अभिनंदन केले.आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नेत्रा नरेंद्र रहाटे व सर्व शिक्षक स्टाफ बहुसंख्येने उपस्थित होता.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें