पोलीस कर्मचारी शिवम प्रकाश आंबुलकर यांचा रत्नागिरी पोलीस अधीक्षकांकडून प्रशस्तिपत्राने गौरव

*पोलीस कर्मचारी शिवम प्रकाश आंबुलकर यांचा रत्नागिरी पोलीस अधीक्षकांकडून प्रशस्तिपत्राने गौरव

 

*ऑनलाइन सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक!*

 

*रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे

महाराष्ट्र पोलिसांच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवरील ऑनलाइन सेवेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल रत्नागिरी पोलिस दलातील पोलीस कॉन्स्टेबल शिवम प्रकाश आंबुलकर (पो.कॉ. ३७४) यांचा पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी यांच्या वतीने प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.

नागरिकांना ऑनलाइन माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे रत्नागिरी पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे (भा.पो.से.) यांच्या स्वाक्षरीचे हे प्रशस्तिपत्र शिवम आंबुलकर यांना प्रदान करण्यात आले. प्रशस्तिपत्रात त्यांच्या प्रशंसनीय कामगिरीबद्दल गौरव करताना, भविष्यातही आवश्यक त्या वेळी अशाच प्रकारे उत्तम कामगिरी बजावत पोलीस दलाचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

 

रत्नागिरी पोलीस दलासाठी अभिमानाची बाब

शासकीय सेवा अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी ऑनलाइन सेवांचे महत्त्व वाढत असताना, राज्यभरात प्रथम क्रमांक मिळविणे ही निश्चितच उल्लेखनीय कामगिरी मानली जात आहे. शिवम आंबुलकर यांच्या या यशाबद्दल पोलीस दलातील सहकारी तसेच नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

“कर्तव्यनिष्ठा, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि नागरिकांना तत्पर सेवा” या त्रिसूत्रीचा आदर्श या कामगिरीतून समोर आला आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें