कोकण सिरत कमिटी तर्फे जिल्हास्तरीय नाअत गायन स्पर्धा व तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

चिपळूण- योगेश पेढाम्बकर
येथील सामाजिक व शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कोकण सिरत कमिटी तर्फे रविवार दि. २७/०९/२६ रोजी दुपारी ठीक २:०० वाजता खदीजा स्कूल गोवळकोट येथील हाजी मोहम्मद शमसुद्दीन असेंबली हॉल मध्ये जिल्हा स्तरीय नाअत गायन स्पर्धा व तालुकास्तरीय इस्लामियात प्रश्न मंजुषा स्पर्धा अति उत्साहात संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी विद्वान व मौलाना वासिफ काजमी तर प्रमुख पाहुणे म्हणून इक्रा स्कूल रत्नागिरीचे डायरेक्टर मौलाना इलियास बगदादी व सलामा टुर्स अण्ड ट्रॅव्हल्सचे मालक हाफिज सलीम परकार, पाहुणे म्हणून स्टॅण्डर्ड ह्युमन रिसोर्सेस कन्सल्टंट जनाब मकबूल साबळे तर कोशिश फाउंडेशन चिपळूणचे सचिव जनाब फैयाज सुर्वे सर उपस्थित होते. या व्यतिरिक्त गोवळकोट एज्युकेशन सोसायटी व्हाईस चेअरमन जफर कटमाले, खदीजा मुख्याध्यापक श्री इरफान शेख सर, अजवा स्वीड्सचे मालक जावेद, पूर्ण सत्य चॅनलचे संपादक जमालुद्दीन बदरकर सर, अशफाक कुपे सर, पडवे ग्राम पंचायत सदस्य जैद भाटकर, इक्रा स्कूल मुख्याध्यापक जैनुलआबिदीन सर, नूरानी सर, कलीम सर, शजाउद्दीन सर, परीक्षक अ. कादिर तांबे सर, जियाउल्ला खान सर, रत्नागिरी येथील मोईन सय्यद सर, इक्बाल दळवी सर, इ. उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुरुवात मौलाना अ-रहमान चौगले यांच्या कुरआण पठणाने झाली. इरफान शेख सर यांच्या हस्ते व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात आले. प्रथम प्रश्न मंजुषा (इ. ३ ते ५ वी) तालुकास्तर घेण्यात आली. त्यानंतर जिल्हास्तरीय ग्रुप नाअत गायन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातील एकूण २५ शाळांनी सहभाग घेतला होता.
सूत्रसंचालन ॲडव्होकेट सुमय्या मेयर यांनी आपल्या विशेष शैलीमध्ये केले. संस्था सचिव श्री मुजाहिद मेयर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व परीक्षकांचे शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन आदर सत्कार केला. परीक्षकांतर्फे मोईन सय्यद तर मान्यवरांतर्फे मौलाना इलियास बगदादी व जनाब फैयाज सुर्वे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संस्था अध्यक्ष श्री सज्जाद काद्री यांनी मार्मिक रिते प्रास्ताविक केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोकण सिरत कमिटीचे वरील मेंबर व्यतिरिक्त जनाब खुरशिद शाह, शेख हुसेन म्हातारनाईक, शाहनवाज शाह, रऊफ गोठे, नदीम तर लेडिज विभागाच्या डॉ. जुवेरिया गोठे, सौ. निलोफर सुर्वे व श्री हुजैफा मेयर इ. विशेष परिश्रम घेतले.
क्विज कॉन्टेस्ट निकाल
• प्रथम क्रमांक —
1. अलि शुजाउद्दीन परकार
2. मर्यम अन्वर शेख (हाजी दाऊद अमीन हायस्कूल कालुस्ते)
• द्वितीय —
1. लायबा मोहसिन बागवान
2. उस्मान जुनेद मेमन (एच.एम. परकार स्कूल गोवळकोट रोड)
• तिसरा क्र. —
1. आयशा जहीर चौगुले
2. आमिना एजाज परकार (जि. प. प्राथ. शाळा चिवेली उर्दू)
• चौथा क्र. —
1. रिहान रिजवान अरकोट
2. हम्जा सिराज खान (महाराष्ट्र हायस्कूल चिपळूण)
• पांचवा क्र. —
1. अ. रहमान मुजम्मिल टेमकर
2. उजेर हिदायत बालाभाई (वांगडे प्राथमिक शाळा / स्कूल चिपळूण)
जिल्हा ग्रुप नाअत गायन स्पर्धा निकाल
• प्रथम — खदीजा इंग्लिश मि. स्कूल गोवळकोट
• द्वितीय — अल अमीन हायस्कूल पोफळी
• तिसरा — अलि पब्लिक स्कूल चिपळूण
• चौथा — जि. प. पूर्ण प्राथ. शाळा पोफळी उर्दू
• पांचवा — महाराष्ट्र हायस्कूल कडवई (संगमेश्वर)












