सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चव्हाण गणेश गौरव पुरस्काराने सन्मानित

*सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चव्हाण गणेश गौरव पुरस्काराने सन्मानित

 

*सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिपळूणच्या वतीने गौरव; आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा*

आबलोली (संदेश कदम) 

अमृत महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिपळूणच्या वतीने ‘गणेश गौरव पुरस्कार’ वितरण सोहळा बुधवारी उत्साहात पार पडला. आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चव्हाण यांना त्यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल ‘गणेश गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

 

शशिकांत चव्हाण हे सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय असून, गरजू रुग्णांना आरोग्यसेवेसंदर्भात मार्गदर्शन करण्यासह विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यांच्या या कार्याची दखल घेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.

 

यावेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ, मंडळाचे अध्यक्ष मोहन मिरगल, राजाभाऊ पाटणकर, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, मिलिंद कापडी, वसंत उदेग, रमण डांगे, समीर जानवलकर, सुनील कुलकर्णी, प्रभंजन पिंपुटकर आदी मान्यवर उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नित्यानंद भागवत यांनी केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें