मिशन प्रबोधन व मिशन अभय अंतर्गत विद्यार्थी सुरक्षा, बालसंरक्षण विषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

मिशन प्रबोधन व मिशन अभय अंतर्गत विद्यार्थी सुरक्षा, बालसंरक्षण विषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

गुहागर : रत्नागिरी पोलीस दलातर्फे नागरिकांमध्ये सुरक्षितता, सजगता व स्वसंरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन प्रबोधन’ व ‘मिशन अभय’ अभियानांतर्गत शालेय स्तरावर विद्यार्थी सुरक्षा व बालसंरक्षण विषयक मार्गदर्शन कार्यक्रम मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, गुहागर येथे उत्साहात संपन्न झाला.

 

मिशन अभय अंतर्गत गुहागर पोलीस स्टेशन यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, POCSO Act (लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा-2012), बालसंरक्षण तसेच किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

 

या कार्यक्रमासाठी गुहागर पोलीस ठाण्याच्या पोलीस कॉन्स्टेबल सौ. सीमा मोरे मॅडम व सौ. सरिका चाळके मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनात सजग राहणे, सुरक्षिततेच्या उपाययोजना जाणून घेणे, अडचणीच्या प्रसंगी योग्य व्यक्तीची मदत घेणे तसेच स्वसंरक्षणाचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

 

तसेच सायबर गुन्हे, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, ऑनलाइन फसवणूक व अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क ठेवताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. POCSO Act अंतर्गत बालकांचे संरक्षण, चांगला व वाईट स्पर्श, संशयास्पद परिस्थितीत त्वरित पालक, शिक्षक किंवा पोलिसांची मदत घेणे याविषयीही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. किशोरवयीन विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले.

 

कार्यक्रमास विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सुजाता कांबळे मॅडम, उपमुख्याध्यापिका श्रीम. मनिषा सावंत मॅडम, पर्यवेक्षिका सौ. गायत्री कनगुटकर मॅडम, पोलीस हवालदार सौ. गौरी शेटे मॅडम व पोलीस कॉन्स्टेबल सौ. रुचिता ताम्हणकर मॅडम यांची उपस्थिती लाभली.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सुजाता कांबळे मॅडम यांनी केले. आभारप्रदर्शन विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका श्रीम. मनिषा सावंत मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. देवकर मॅडम यांनी केले.

 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी, बालसंरक्षणासाठी तसेच किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा आणि स्वसंरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा मार्गदर्शनपर कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें