मुख्य निवडणूक आयुक्तांवर कारवाई आणि रत्नागिरीत सरसकट दुष्काळी अनुदानाची मागणी; काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मुख्य निवडणूक आयुक्तांवर कारवाई आणि रत्नागिरीत सरसकट दुष्काळी अनुदानाची मागणी; काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

राजापूरच्या माजी नगराध्यक्ष हुस्नबानू खलपे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन; काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित

रत्नागिरी:/अस्लम शेख

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित चुकीच्या कारभाराची व मतदार यादीतील बदलांची स्वतंत्र चौकशी करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, तसेच त्यांच्या निर्णयांना स्थगिती देण्यात यावी, या मुख्य मागणीसह रत्नागिरी जिल्ह्याला सरसकट दुष्काळी अनुदान जाहीर करावे, या मागणीसाठी आज रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या सरचिटणीस तथा राजापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष हुस्नबानू खलपे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली हे निवेदन सोपवण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रशासनाच्या कारभारावर आणि स्थानिक दुष्काळग्रस्त परिस्थितीवर जोरदार निशाणा साधला.

या प्रसंगी रत्नागिरी शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ पदाधिकारी, जिल्हा, शहर व तालुका स्तरावरील अध्यक्ष, आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका आणि काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने या मागण्यांची तात्काळ दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला

आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें