‘चिंबोरे युद्ध’च्या कन्नड अनुवादाचे मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत प्रकाशन

‘चिंबोरे युद्ध’च्या कन्नड अनुवादाचे मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत प्रकाशन

प्रतिनिधी (मंगेश जाधव)

ज्येष्ठ साहित्यिक बाळासाहेब लबडे यांच्या गाजलेल्या ‘चिंबोरे युद्ध’ या कादंबरीचा कन्नड अनुवाद प्रकाश पर्वतीकर यांनी केला असून, या कन्नड आवृत्तीचे प्रकाशन देशातील विविध भागांतील ज्येष्ठ साहित्यिकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात झाले.

या प्रकाशन सोहळ्यास ओडिशाचे जगप्रसिद्ध कवी मनोरंजन साहू, डॉ. बसवेश्वर चेनगे, कोप्पळ (कर्नाटक) येथील डॉ. महेश बेल्लारी, डॉ. प्रतिमा इंगोले, समीक्षक डॉ. चंद्रकांत पोतदार, बंगळूरूचे डॉ. लक्ष्मण राव, हैदराबादचे कवी श्रीनिवास राव, डॉ. संजय बोरुडे, डॉ. कस्तुरे, कवी शशिकांत शिंदे तसेच साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक अल्लमप्रभु बेट्टादुर यांच्यासह अनेक साहित्यिक उपस्थित होते.

यावेळी कादंबरीवर भाष्य करताना समीक्षक डॉ. महेश बेल्लारी यांनी ‘चिंबोरे युद्ध’ ही अत्यंत विचारशील कादंबरी असून ती वाचकाला अंतर्मुख होऊन विचार करण्यास प्रवृत्त करते. कादंबरीमध्ये प्रभावी पॉलिटिकल सटायर असून कन्नड वाचक या कादंबरीचे निश्चितच स्वागत करतील, असे मत व्यक्त केले.

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक अल्लमप्रभु बेट्टादुर यांनी या कादंबरीतील वेगळेपण अधोरेखित करताना ती प्रभावी मॅजिक रियालिझमची कादंबरी असल्याचे नमूद केले. कादंबरीच्या आशयातील वैशिष्ट्यपूर्ण प्रयोगशीलता आणि वास्तवाच्या वेगळ्या मांडणीमुळे तिचे स्वतंत्र साहित्यिक महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील महत्त्वपूर्ण कादंबरी कन्नड भाषेत अनुवादित झाल्यामुळे मराठी आणि कन्नड साहित्यविश्वामधील साहित्यिक संवादाला नवे व्यासपीठ मिळाले आहे. अनुवादक प्रकाश पर्वतीकर यांच्या माध्यमातून ‘चिंबोरे युद्ध’ आता कन्नड वाचकांपर्यंत पोहोचली आहे.

या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन डॉ. संजय बोरुडे यांच्या हिंदी अनुसंधान केंद्र, अहमदनगर आणि गविसिद्ध एन. बल्लारी प्रतिष्ठान, कोप्पळ (कर्नाटक) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. विविध भारतीय भाषांतील साहित्यिकांच्या उपस्थितीमुळे हा प्रकाशन सोहळा मराठी-कन्नड साहित्यिक संवादाचा महत्त्वपूर्ण प्रसंग ठरला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें