*राजापूर तालुक्यातील कातळी शिंदे शिवसेना गटात अस्वस्थता
*नंतर प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची पूर्ती गळचेपी, पर्याय शोधण्यास सुरवात
*समिर शिरवडकर- रत्नागिरी
रत्नागिरी:-(राजापूर- सागवे):- राजापूर तालुक्यातील नूतन आमदार किरण भैया सामंत यांच्या विजयानंतर त्यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास ठेवत तालुक्यातील अनेक विभागातील ग्रामस्थांनी इतर पक्ष सोडून विकासकामसाठी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.आणि आजही प्रवेश सुरू आहेतच, त्याचप्रमाणे सागवे विभागातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सर्वच, शिवसैनिक अनुक्रमे विभाग प्रमुख,उपविभाग प्रमुख, सर्व शाखाप्रमुख, सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी सदस्य, तसेच संपूर्ण महिला आघाडी यांनी सन्माननीय किरण भैया सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत फार मोठ्या संख्येने प्रवेश केला होता, परंतु हा प्रवेश फक्त प्रवेशच राहिला, या प्रवेशांमधील कुठल्याही व्यक्तीला आजतागायत कुठल्याही कार्यक्रमाला कुठलाही शुभारंभाला अगर कोणत्याही शिंदे गटातील कार्यक्रमाला या परिसरातील नव्याने प्रवेश केलेल्या कोणत्याही कार्यकर्त्याला शिवसेना शिंदे गटातील जुने कार्यकर्ते जुमानत नसल्याने कोणत्याही शुभ कार्याला नव्याने प्रवेश केलेले कार्यकर्ते उपस्थित नसतात,जेणेकरून त्यांना कोणत्याही कार्यक्रमाची रूपरेषा, किंवा माहिती दिली जात नाही यामुळेच हे सर्व कार्यकर्ते किंवा कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थ असल्याचे दिसून येत आहे. यावर वारंवार शिंदे गटातील विभाग प्रमुख ,तालुकाप्रमुख ,व अन्य पदाधिकाऱ्यांना याची कल्पना देऊनही आजतागायत कोणतीही सुधारणा होत नसल्याने नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांची मने खूप दुखावलेली आहेत. याची संपूर्ण माहिती सन्माननीय आमदार किरण भैया सामंत यांना दिली असता, आज पर्यंत कुठलीही कारवाई झालेली दिसून येत नाही.असे प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे..
मागून प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा प्रवेश हा नुसताच प्रवेश आहे का? असाही प्रश्न त्या कार्यकर्त्यांना पडलेला आहे. म्हणून त्यांच्या मनात शंकेवर शंका उपस्थित होत असून आम्ही पक्षात आहोत की नाही? हेच त्यांना कळत नसल्याने त्यांच्यामध्ये अस्वस्थपान खूप वाढली आहे , यावर वरिष्ठ काही निर्णय घेतील का?की प्रवेश केलेल्या कार्यकर्ते दुसरीकडे तर जाणार नाहीत ना याची दक्षता सन्माननीय भैय्या सामंत यांनी घेतली पाहिजे अन्यथा सागवे विभागातील सर्वच कार्यकर्ते (जे नव्याने प्रवेश केले आहेत) कुठेही जाऊ शकतील किंवा जाऊ शकतात याचा नेम नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.












