रत्नागिरीत निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसचा मूक मोर्चा

*रत्नागिरीत निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसचा मूक मोर्चा

 रत्नागिरी वार्ताहर: अस्लम शेख.

रत्नागिरीत आज काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या मतदानाच्या मूलभूत अधिकारावर गदा आणली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेच्या माध्यमातून मतचोरी होत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा किंवा त्यांना पदावरून बडतर्फ करण्यात यावे, अशा मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.

 

रत्नागिरी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मूकमोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस आणि राजापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे, सरचिटणीस रमेश कीर, दक्षिण रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जमीर खलिफे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

दोन ते आठ ऑक्टोबरदरम्यान चालणाऱ्या लोकशाही बचाव आंदोलनाचा हा भाग असल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रदेश सरचिटणीस हुस्नबानू खलिफे यांनी सांगितलं. पारदर्शकता जपण्यासाठी ईव्हीएमऐवजी पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा काँग्रेसच्या नेत्यांनी या वेळी दिला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें