सौ. आसावरी मंदार पवार यांच्या स्किन केअर कार्यशाळेला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसा

highlits

*सौ. आसावरी मंदार पवार यांच्या स्किन केअर कार्यशाळेला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

*रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे*

 

बदलते हवामान, प्रदूषण, धावपळीची जीवनशैली आणि वाढता मानसिक ताण यांचा परिणाम त्वचा व केसांच्या आरोग्यावर होत असतो. या पार्श्वभूमीवर त्वचा आणि केसांची योग्य पद्धतीने निगा राखण्याबाबत जनजागृती करण्यासाठी आधुनिक सलोन, राम लेन, रत्नागिरी यांच्या वतीने सौ. आसावरी मंदार पवार यांच्या पुढाकाराने ‘स्किन केअर’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. रत्नागिरीतील Viva Executive येथे झालेल्या या कार्यशाळेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यशाळेत त्वचेचा प्रकार समजून घेण्यापासून ते दैनंदिन स्किन केअर रूटीनपर्यंत विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. हवामानातील बदल, सूर्यकिरण, प्रदूषण आणि चुकीच्या उत्पादनांचा त्वचेवर होणारा परिणाम तसेच केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत काळजीच्या पद्धती सहभागींसमोर स्पष्ट करण्यात आल्या.

 

विशेष म्हणजे, त्वचेच्या समस्या केवळ बाह्य सौंदर्य उपचारांनी दूर करण्याऐवजी योग्य आहार, पुरेसे पाणी, जीवनशैलीतील बदल आणि नियमित होम केअर यांचे महत्त्वही यावेळी अधोरेखित करण्यात आले. सहभागींच्या वैयक्तिक प्रश्नांना उत्तरे देत त्यांच्या त्वचेच्या गरजेनुसार योग्य स्किन केअर रूटीन कसे निवडावे, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

 

सौ. आसावरी मंदार पवार यांना ब्युटी क्षेत्रातील ११ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतली असून पुणे, मुंबई आणि दिल्ली येथील नामांकित संस्थांमधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ब्युटी प्रशिक्षण घेतले आहे. ‘Personalise Beauty and Professional Science’ या संकल्पनेच्या माध्यमातून सौंदर्यसेवेसोबतच ग्राहकांना त्वचा व सौंदर्यविषयक योग्य ज्ञान देण्यावर त्यांचा भर आहे.

 

‘सुंदर दिसण्यापेक्षा आपल्या त्वचेची गरज समजून घेणे महत्त्वाचे’ हा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला. व्यक्तीनुसार त्वचेची गरज वेगळी असल्याने प्रत्येकाने आपल्या त्वचा व केसांचा प्रकार ओळखून योग्य आणि सातत्यपूर्ण self-care routine स्वीकारावा, असा सल्लाही यावेळी देण्यात आला.

 

नागरिकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे त्वचा, केस आणि वैयक्तिक आरोग्याबाबत शास्त्रीय माहिती देणाऱ्या अशा जनजागृतीपर उपक्रमांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें