तळवलीचे सामाजिक कार्यकर्ते महेश शिगवण यांच्या पुढाकाराने आगरवाडी पूर्व व भेळेवाडी ग्रामस्थांच्या श्रमदानातुन साकारला वनराई बंधारा ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी (मंगेश जाधव)-गुहागर
तालुक्यातील तळवली गावचे सामाजिक कार्यकर्ते महेश शिगवण व मित्र मंडळ तसेच भेळेवाडी आगरवाडी पूर्व ग्रामस्थांच्या श्रमदानातून भेळेवाडी गणपती विसर्जन नदीपात्रात वनराई बंधारा बांधण्यात आला. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तळवलीचे सामाजिक कार्यकर्ते महेश शिगवण यांच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या श्रमदानातून बंधारा उभारण्यात आला असून पाणी अडवा पाणी जिरवा या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यंदा पाणीटंचाईचे संकट लक्षात घेता भविष्यात गावात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी नदीपात्रातील योग्य ठिकाणी चार ते पाच बंधारे बाधंण्याचा संकल्प करण्यात आला. यासाठी भेळेवाडी तळवली आगरवाडी पूर्व ग्रामस्थांनी श्रमदानातून या बंधारा बाधंण्याच्या कामात सहभाग घेतला नदीपात्रातील पाणी अडवून ते पाणी जमीनीत मुरावे भूजलपातळी वाढावी आणि आगामी उन्हाळ्यात गावातील पाणीटंचाई कमी व्हावी हा मुख्य उदेश सामाजिक कार्यकर्ते महेश शिगवण यांनी व्यक्त केला. बंधारा कामाचे उदघाटन श्रीफळ वाढवून सभापती श्री. प्रणव पोळेकर व उपसभापती श्री. निलेश सुर्वे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला सभापती प्रणव पोळेकर उपसभापती निलेश सुर्वे पंचायत समिती सदस्य मंगेश जोशी ग्रामविकास अधिकारी गोरे महसूल अधिकारी एच. आर. भिसे मंडळ अधिकारी भरत जाधव भाजपा सचिव सचिन ओक ग्रामस्थ गुरुनाथ कारेकर शशिकांत किजंळे संदीप शिगवण ग्रामदेवता अध्यक्ष गणपत शिगवण प्रकाश भुवड रमेश गोठणकर महेश शिगवण संदीप शिगवण पत्रकार मयुरेश भागवत आशिष कारेकर प्रदीप चव्हाण मंगेश जाधव व महीला मंडळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











