गुहागर तालुक्यात अजून 700 बंधारे बांधण्याचे टार्गेट पूर्ण करायचे आहे – सभापती प्रणव पोळेकर यांचा विश्वास….

गुहागर तालुक्यात अजून 700 बंधारे बांधण्याचे टार्गेट पूर्ण करायचे आहे – सभापती प्रणव पोळेकर यांचा विश्वास….

आबलोली (संदेश कदम)

जर बघायला गेलो तर यावेळी अललीनोचा प्रभाव हा अख्या राज्यभर पाहायला मिळतोय आणि त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती सध्या राज्यभर पाहायला मिळते आणि त्याचाच परिणाम सध्या गुहागर तालुक्यामध्ये देखील होताना पाहायला मिळतोय आणि त्याच परिणामाला कुठेतरी ब्रेक लागावा पाणी जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात जिरवून ठेवण्यासाठी आदरणीय रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत यांनी एक आवाहन केलं होतं की, 16 तारखेला अख्या राज्यभर बंधारे बांधण्याचे मिशन जे आहे.ते राबवण्याचा निर्णय यावेळी त्यांनी घेतला. आणि त्याला गुहागरच्या पंचायत समितीने चांगलाच प्रतिसाद दिलेला आहे. आणि ही मोहीम गुहागर तालुक्यात या घडीला साधारणतः 500 बंधारे बांधले आहेत. अजून आपल्याला 700 बंधारे बांधण्याचे टार्गेट पूर्ण करायचे आहे असा विश्वास गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर यांनी व्यक्त केला.

गुहागर तालुक्यातील आबलोली येथील वाकी नदीवर लोकसहभागातून निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांच्या माध्यमातून जेसीबीच्या सहाय्याने वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे यांनी भेट देऊन ग्रामस्थांचे कौतुक केले.

यावेळी बोलताना सभापती प्रणव पोळेकर पुढे म्हणाले की, पंचायत समितीची आढावा बैठक आम्ही 8 ऑक्टोबरला घेतली. यावेळी वेगवेगळ्या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून कशाप्रकारे बंधाऱ्यांचे नियोजन करता येईल याचा आम्ही एक आराखडा तयार केला होता. आणि त्याच्याच माध्यमातून आबलोली येथे आज बंधारे बांधण्याचे काम सुरू आहे. तसा संकल्प इथल्या ग्रामस्थांनी केला होता त्याला यश आलंय. खरंतर मी इथल्या सरपंचांचे आणि ग्रामस्थांचे आभार मानतो कारण त्यांनी या उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला.

मोठ्या प्रमाणात पाण्याचे स्त्रोत्र कमी होताना पाहायला मिळते. साधारण 1.41 मीटरने आपले पाणी पातळी कमी झाले ते कशा पद्धतीने वाढवता येईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत.ते काम चालू केले आणि मिशन बंधारा ही मोहीम गुहागर तालुक्यामध्ये जोरदार सुरू झाली आणि त्यातूनच आता 500 बंधारे बांधले आहेत. अजून आपल्याला 700 बंधाऱ्यांचे टार्गेट पूर्ण करायचे आहे ते टार्गेट येत्या काही दिवसात पूर्ण करू. आज मोठ्या प्रमाणात बंधाऱ्यांची शृंखला तयार झाली आणि मोठ्या संख्येने लोक यामध्ये सहभागी होताहेत. असा विश्वासही सभापती प्रणव पोळेकर यांनी व्यक्त केला.

यावेळी सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, सरपंच सौ.वैष्णवी नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, पोलीस पाटील महेश भाटकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. रूपाली कदम, श्रीमती. नम्रता निमूणकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन कारेकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष पालशेतकर, माजी सरपंच प्रमेय आर्यमाने, योगेश पालशेतकर, योगेश भोसले, समीर शिंदे,रेणुका पवार,प्रथमेश निमूणकर, प्रशांत नेटके, उदय सुर्वे आदि. उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें