रत्नागिरीच्या रामआळीतून कापड व्यावसायिकाचे अपहरण; शहरात खळबळ

highlight

रत्नागिरीच्या रामआळीतून कापड व्यावसायिकाचे अपहरण; शहरात खळबळ

५३ वर्षीय सज्जन ओसवाल बेपत्ता; रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रत्नागिरी | प्रतिनिधी

रत्नागिरी शहरातील गजबजलेल्या रामआळी परिसरातून ५३ वर्षीय कापड व्यावसायिकाचे अपहरण झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. सज्जन अमरचंद ओसवाल असे अपहरण झालेल्या व्यावसायिकाचे नाव असून, या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अपहरित व्यावसायिकाचा शोध घेण्यात येत आहे.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सज्जन अमरचंद ओसवाल (वय ५३, रा. घर क्रमांक १९१८, रामआळी, अमरसन्स गारमेंट, रत्नागिरी) हे कापड व्यवसाय करतात. ते ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आठवडा बाजार येथील ‘यश ट्रेडर्स’ या दुकानातून आपले चुलतभाऊ निर्मल रमेश ओसवाल यांना भेटण्यासाठी निघाले होते. मात्र, त्यानंतर ते घरी परतले नाहीत.

 

कुटुंबीयांनी त्यांचा विविध ठिकाणी शोध घेतला; मात्र ते आढळून आले नाहीत. यानंतर त्यांचे पुत्र रोहित सज्जन ओसवाल (वय २७, व्यवसाय कापड व्यवसाय) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

 

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणातून सज्जन ओसवाल यांना बळजबरीने पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ९ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजून ४४ मिनिटांनी भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या घटनेमुळे रत्नागिरी शहरात खळबळ उडाली असून, अपहरणामागील कारण आणि संबंधित व्यक्तीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें