डोंबिवली पश्चिमेच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न पुढील अनेक वर्षांसाठी मार्गी… सन्माननीय खासदार मा. श्री. डॉ. श्रीकांतजी एकनाथ शिंदे यांच्या मागणीमुळे व त्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला आलेले मोठे यश
नवीमुंबई (मंगेश जाधव)
डोंबिवली शहराला(पूर्व व पश्चिम) सन १९८८ पासून वीजपुरवठा करण्यासाठी २०० MVA क्षमतेचे १०० kV डोंबिवली उपकेंद्र डोंबिवली पूर्व येथे कार्यरत होते. मात्र गेल्या काही वर्षांत शहराचा झपाट्याने विकास आणि वाढती लोकसंख्या यामुळे या उपकेंद्रावर मोठा ताण निर्माण झाला होता. त्यातच डोंबिवली पश्चिम येथेही याच उपकेंद्रातून पुरवठा करण्यात येत होता. यासाठी रेल्वे रुळा खालून लेबल्स टाकण्यात आल्या आहेत. भविष्यात रेल्वे रुळाखाली सदर केबल्सचा स्फोट झाला असता किंवा त्यात बिघाड झाला असता तर रेल्वे गाड्या थांबवून दुरुस्तीचे काम करण्यास रेल्वे प्रशासना कडून परवानगी मीळणे शक्य झाले नसते.
विशेषतः डोंबिवली पश्चिम भागासाठी स्वतंत्र उपकेंद्र उभारण्याची मागणी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती. मात्र डोंबिवली पश्चिम परिसरात मोठ्या क्षमतेचे उपकेंद्र उभारण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध नसल्यामुळे हा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मा. खासदार डॉ. श्रीकांतजी एकनाथ शिंदे साहेब यांच्या सततच्या प्रयत्ना मुळे डोंबिवली खाडीपलीकडे लोढा बिल्डर कडून जागा उपलब्ध करूम घेउन २०० MVA क्षमतेचे २२० kV माणकोली उपकेंद्र उभारण्यात आले आहे. तसेच माणकोली पुलामार्गे या उपकेंद्रातून डोंबिवली पश्चिम भागाला वीजपुरवठा करण्याची सक्षम व्यवस्था करण्यात आली आहे.
या प्रकल्पासाठी खासदार साहेबांन बरोबर, खासदार कार्यालय प्रमुख श्री. प्रफुल्ल देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा करून मोठे प्रयत्न केले. परीणामस्वरूप हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात साकार होऊ शकला असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या प्रकल्पाची पहाणी आणी पुढील कामाची माहीती घेण्यासाठी आज कल्याण जिल्हा प्रमुख श्री. गोपाळजी लांडगे साहेब, खासदार कार्यालय प्रमुख श्री. प्रफुल्ल देशमुख, श्री. राहुल गणपुले, श्री. सुहास गावडे, श्री. संदीप जाधव हे सदर प्रकल्पाची पहाणी करताना उपस्थित होते. पुढील कामात येणार-या संभाव्य अडचणींची माहीती करून घेतली.
सदर प्रसंगी महावितरण तर्फे असिस्टंट एक्झीक्यूटिव्ह इंजीनीयर श्री. महेंद्र वाकपाइजान, AE श्री. संजय जाधव, AE श्री. विवेक मेश्राम व मानकोली सबस्टेशन चे इंजीनीयर श्री. अतुल आव्हाड व इतर कर्मचारी उपस्थीत होते.











