नवरात्रोत्सवात राज्यभरात ‘जागर आरोग्याचा-मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमाचे आयोजन

नवरात्रोत्सवात राज्यभरात ‘जागर आरोग्याचा-मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमाचे आयोजन

*आजपासून महाविद्यालयांमध्ये रंगणार जनजागृती व्याख्याने

*रत्नागिरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांच्या विशेष समन्वयाने संपूर्ण महाराष्ट्रभरात “जागर आरोग्याचा-मुख्यमंत्री आरोग्य संवाद” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

नवरात्रोत्सवाच्या कालावधीत ११ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२६ या दरम्यान हा उपक्रम राज्यभर राबवला जात आहे.

 

तरुणाईच्या आरोग्यावर भर या मोहिमे अंतर्गत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर, जिल्हा आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि जिल्हा मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये व्याख्यानांचे आयोजन केले जात आहे.

 

व्याख्यानांमधून प्रामुख्याने बदलती जीवनशैली आणि तरुणांचे आरोग्य,

संतुलित व निरोगी आहाराच्या सवयी, व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक आरोग्य, मोबाईल-सोशल मीडियामुळे वाढणारा स्क्रीनटाइम,

व्यसनाधीनता, त्याचे तोटे व दुष्परिणाम यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

 

एमयूएचएस अंतर्गत वैद्यकीय व निमवैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १३ ऑक्टोबर २०२६ रोजी या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

 

जिल्ह्यातही विविध महाविद्यालयांच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात असून त्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

 

१४ ऑक्टोबर: लोकनेते मा. शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय रत्नागिरी,

शासकीय पॉलिटेक्निक रत्नागिरी, आणि शासकीय फार्मसी महाविद्यालय रत्नागिरी.

 

१५ ऑक्टोबर: शासकीय अध्यापक महाविद्यालय रत्नागिरी.

 

१७ ऑक्टोबर: गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी,

फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालय रत्नागिरी, शासकीय ITI (मुलांची व मुलींची) रत्नागिरी, फिशरीज महाविद्यालय रत्नागिरी, तसेच महर्षि कर्वे स्त्री-शिक्षण संस्था शिरगाव रत्नागिरी

 

१९ ऑक्टोबर: नवनिर्माण महाविद्यालय रत्नागिरी.

 

सहभागाचे आवाहन आणि संपर्क

जिल्ह्यातील अन्य सर्व महाविद्यालये आणि वरिष्ठ शैक्षणिक संस्थांनी आपल्या जवळच्या आरोग्य यंत्रणेशी समन्वय साधून या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करावे.

 

या उपक्रमाविषयी काही अडचणी किंवा माहिती हवी असल्यास जिल्हा मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षाचे वैद्यकीय अधिकारी सुमित सावंत व समाजसेवा अधीक्षक केदार ढेकणे यांच्याशी 8830147295 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष यांनी केले आहे.

————–===———–

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

डोंबिवली पश्चिमेच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न पुढील अनेक वर्षांसाठी मार्गी… सन्माननीय खासदार मा. श्री. डॉ. श्रीकांतजी एकनाथ शिंदे यांच्या मागणीमुळे व त्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला आलेले मोठे यश

Horoscope

Weather

और पढ़ें

डोंबिवली पश्चिमेच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न पुढील अनेक वर्षांसाठी मार्गी… सन्माननीय खासदार मा. श्री. डॉ. श्रीकांतजी एकनाथ शिंदे यांच्या मागणीमुळे व त्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला आलेले मोठे यश

राज्य

शहर चुनें