मिशन बंधारे 2026पांगारी तर्फे वेळंब ग्रामस्थांचे पाण्यासाठी अविरत श्रमदानाचे 16 वे वर्ष
प्रतिनिधी (मंगेश जाधव)
पंचायत समिती गुहागर चा पाणी टंचाईवर मात करण्यासाठीचा हा महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानाचा स्तुत्य उपक्रम. यंदा पाऊस खूप कमी पडलाय.तीन हजार सरासरी असलेल्या तालुक्यात फक्त 2300 मीलीमिटर पाऊस पडला.
परतीचा पाऊस पडलाच नाही.परतीचा पाऊस हा बऱ्यापैकी भूगर्भातील पाण्याची पातळी कायम ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतो.पण यंदा तो आलाच नाही. सरासरीपेक्षा 700 मिलीमीटर पाऊस कमी पडल्याने उन्हाळ्यात होणारी पाणी टंचाई अगदी स्पष्ट दिसतेय यावर उपाय हाच.. मिशन बंधारे प्रशासनाने कंबर कसली व लोकप्रतिनिंकडून मिशन बंधारेसाठी आवाहन केल्या गेले. दोन दिवसापूर्वीच उपसभापती श्री. निलेशजी सुर्वे यांनी याबाबत आवाहन केले होते. या अभियानात
लोकप्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभागही नोंदवला,हे
निश्चितच प्रेरक आहे.पंचायत समिती सभापती मा. श्री.प्रणवजी पोळेकर व उपसभापती मा.श्री.नीलेशजी सुर्वे यांच्या आवाहनाला ग्रामस्थांचा प्रतिसाद दिला.
व आजच्या दिवशी तालुक्यात 100हून अधिक बंधारे बांधून कोट्यावधी लिटर पाणी अडले आहे.
गुहागर तालुक्यातील पांगारी वेळंब येथे सुमारे 30 मिटर लांबीचा विजय बंधारा बांधण्यासाठी उपस्थित राहून पाणी अडविण्याच्या स्तुत्य उपक्रमात खारीचा वाटा उचलता आला,याचा मला अभिमान वाटतो. खरं तर हा बंधारा ग्रामस्थ नेहमी जानेवारीत बांधतात. यावेळी तीन महिने अगोदर हा बंधारा बांधलाय.*
जिल्हा परिषद सदस्या सौ. अपूर्वा बारगोडे मॅडम, पंचायत समिती सदस्या सौ. मानसी रांगळे मॅडम ,माजी सभापती व माजी नगराध्यक्ष श्री. राजेशजी बेंडल साहेब ,माजी कृषी विस्तार अधिकारी श्री. गजेंद्र पौनीकर , कृषी विस्तार अधिकारी तथा प्रशासक श्री. प्रतिक जाधव, ग्रामपंचायत अधिकारी श्री. संजय गोरे, माजी सरपंच पांडुरंग दौलत खांबे, माजी सरपंच विष्णू वीर, तंटामुक्ती अध्यक्ष शूरसेन जाधव ,वाडीप्रमुख अनिल वणे , वाडीअध्यक्ष शिवाजी खांबे, कृष्णा गिजे, विलास जनार्दन कांबळे, अनंत तांबे, अनंत खांबे, अरविंद खांबे, अंगणवाडी सेविका ,आशा सेविका ,सर्व कर्मचारी , ग्रामस्थ व महिला बचत गटातील महिलावर्ग उपस्थित होते.











