जि. प. पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा साटवली नं. १ मध्ये ‘शारदोत्सव २०२६’ व बालआनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

जि. प. पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा साटवली नं. १ मध्ये ‘शारदोत्सव २०२६’ व बालआनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

साटवली (प्रतिनिधी): जितेंद्र चव्हाण

प्राथमिक

स्थानिक जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा साटवली मराठी नं. १ मध्ये आज, शनिवारी (१७ ऑक्टोबर २०२६) शारदोत्सव आणि बालआनंद मेळाव्याचे औचित्य साधून सरस्वती पूजन सोहळा अत्यंत उत्साही व मंगलमय वातावरणात पार पडला. बुद्धीची व ज्ञानाची देवता मानल्या जाणाऱ्या श्री सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

 

या प्रसंगी शाळेत विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुलांसाठी मजेशीर खेळ (फनी गेम्स) तसेच मुला-मुलींचा पारंपरिक दांडिया नृत्याचा कार्यक्रम रंगला. पारंपरिक वेषभूषेत नटलेल्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उस्फूर्त सहभाग नोंदवला.

 

या शारदोत्सव सोहळ्यात स्थानिक अंगणवाडीतील चिमुकले विद्यार्थी देखील मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. त्यांच्या गोजिरवाण्या सहभागाने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवली.

 

या कार्यक्रमास मुख्याध्यापक दिवाळे गुरुजी, बाबा माने गुरुजी, जयंत माने गुरुजी हे शिक्षकवृंद तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस प्रमुख उपस्थित होते.

 

मातेच्या आरतीने व मुलांच्या उल्हासपूर्ण गजराने संपूर्ण शाळा परिसर दुमदुमून गेला होता. सर्व उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचे कौतुक करत त्यांना बालआनंद मेळावा व शारदोत्सव प्रसंगी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

डोंबिवली पश्चिमेच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न पुढील अनेक वर्षांसाठी मार्गी… सन्माननीय खासदार मा. श्री. डॉ. श्रीकांतजी एकनाथ शिंदे यांच्या मागणीमुळे व त्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला आलेले मोठे यश

Horoscope

Weather

और पढ़ें

डोंबिवली पश्चिमेच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न पुढील अनेक वर्षांसाठी मार्गी… सन्माननीय खासदार मा. श्री. डॉ. श्रीकांतजी एकनाथ शिंदे यांच्या मागणीमुळे व त्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला आलेले मोठे यश

राज्य

शहर चुनें