निबंध स्पर्धेत विहान यादवचे यश; पाचेरी सडा नं. १ शाळेचा नावलौकिक!

*निबंध स्पर्धेत विहान यादवचे यश; पाचेरी सडा नं. १ शाळेचा नावलौकिक!

 

गुहागर : सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत पाचेरी सडा नं. १ शाळेचा इयत्ता पाचवीतील विद्यार्थी विहान वैभव यादव याने द्वितीय क्रमांक पटकावला. त्याच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विहान चे या यशाबद्दल पंचायत समिती गुहागर सभापती श्री. प्रणव पोळेकर साहेब , उपसभापती श्री.निलेश सुर्वे साहेब , गुहागर नगरपरिषद उपनगराध्यक्ष श्री.बेंडल साहेब, तहसीलदार श्री. परिक्षित पाटील साहेब, गटशिक्षणाधिकारी श्री. रायचंद गळवे साहेब , शिक्षण विस्तार अधिकारी सौ. सारिका शिंदे मॅडम यांनी कौतुक केले.

 

विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्याला, कल्पनाशक्तीला आणि सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी आयोजित या स्पर्धेत विहानने उल्लेखनीय कामगिरी केली. त्याच्या या यशामागे त्याची मेहनत, जिद्द आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.

 

विहानच्या या यशाबद्दल केंद्राच्या केंद्र प्रमुख सौ. जाधव मॅडम शाळेचे मुख्याध्यापक श्री. वाघ सर , शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थ पाचेरी सडा यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही आपल्या गुणवत्तेच्या जोरावर तालुकास्तरावर यश मिळवू शकते, हे विहानने आपल्या कामगिरीतून सिद्ध केले आहे. त्याच्या या यशामुळे पाचेरी सडा नं. १ शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे.

 

विहानचे हार्दिक अभिनंदन! त्याच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

डोंबिवली पश्चिमेच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न पुढील अनेक वर्षांसाठी मार्गी… सन्माननीय खासदार मा. श्री. डॉ. श्रीकांतजी एकनाथ शिंदे यांच्या मागणीमुळे व त्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला आलेले मोठे यश

Horoscope

Weather

और पढ़ें

डोंबिवली पश्चिमेच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न पुढील अनेक वर्षांसाठी मार्गी… सन्माननीय खासदार मा. श्री. डॉ. श्रीकांतजी एकनाथ शिंदे यांच्या मागणीमुळे व त्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला आलेले मोठे यश

राज्य

शहर चुनें