पाटपन्हाळे गावात जलक्रांतीचे पाऊल! ग्रामपंचायत, नाम फाउंडेशन आणि PPL च्या माध्यमातून ऐतिहासिक श्रमदान मोहीम

पाटपन्हाळे गावात जलक्रांतीचे पाऊल! ग्रामपंचायत, नाम फाउंडेशन आणि PPL च्या माध्यमातून ऐतिहासिक श्रमदान मोहीम 

प्रतिनिधी (मंगेश जाधव)

गावाच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी आणि शाश्वत जल संवर्धनासाठी गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे गावात एक कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात आला. ग्रामपंचायत पाटपन्हाळे, नाम फाउंडेशन आणि पाटपन्हाळे प्रीमियर लीग (PPL) ब्लू स्टार कला क्रिडां मंडळ कदमवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने गावात पाणी अडवण्यासाठी बंधारा मोहीम आणि सिमेंट बंधाऱ्यांमधील गाळ उपसण्याचे (Desiltation) काम मोठ्या उत्साहात पार पडले. गावाच्या पाण्याच्या भविष्यासाठी आयोजित केलेल्या या श्रमदान मोहिमेला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज दिवशी एकूण 7 बंधारे व 2 सिमेंट बांधरा मधील गाळ उपसन्यात आला.

उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई दूर करणे आणि नदीपात्रातील जलसाठा वाढवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. बंधाऱ्यांमध्ये साचलेला गाळ काढल्यामुळे आता पाणी साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असून, याचा थेट फायदा परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांच्या भूजल पातळी वाढण्यात होणार आहे.

या मोहिमेत संपूर्ण कदमवाडी, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य मनिष कदम सहित, मनिष चव्हाण, साहिल गुरव, सचिन राऊत, परशा गोसावी, उमेश राऊत, संतोश राऊत, परशुराम चव्हाण, राजन चव्हाण, दीपक मोरे, सतीश भेकरे, प्रताप काका चव्हाण, सुधाकर काका चव्हाण, श्रीधर काका गुरव, संजय राऊत, वासू काका सावंत, अबालवृद्धांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्रमदान केले. लोकसहभाग आणि सामाजिक संस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून राबवलेला हा उपक्रम आजूबाजूच्या गावांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरेल. ग्रामस्थांनी दाखवलेली ही एकजुट गावाला समृद्धीच्या वाटेवर घेऊन जाणारी ठरेल , असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें