रत्नागिरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई; महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचा प्रादेशिक बंदर अधिकारी ६० हजारांच्या लाच स्वीकारताना जाळ्यात

रत्नागिरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई; महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचा प्रादेशिक बंदर अधिकारी ६० हजारां ची लाच स्वीकारताना जाळ्यात

लांजा प्रतिनिधी- जितेंद्र चव्हाण 

परदेशी जहाजाला समुद्र चाचणीची (Sea Trial) व पोर्ट क्लियरन्स प्रमाणपत्र देण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, रत्नागिरीचे प्रादेशिक बंदर अधिकारी (वर्ग-१) व त्याच्या एका खाजगी मध्यस्थाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी ही धडक कारवाई करण्यात आली.

 

काय आहे प्रकरण?

तक्रारदाराची शिपिंग एजन्सी असून, रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या जहाजांना सेवा पुरवण्याचे व दुरुस्तीचे काम त्यांच्यामार्फत केले जाते. जयगड पोर्ट येथे आलेल्या एका परदेशी जहाजाची दुरुस्ती झाल्यानंतर जहाजाला समुद्र चाचणीची परवानगी देण्यासाठी आणि पोर्ट क्लियरन्स प्रमाणपत्र देण्यासाठी आरोपी क्रमांक-१, संदीप विलासराव भुजबळ (वय ४७, प्रादेशिक बंदर अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, रत्नागिरी) यांनी तक्रारदाराकडे ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

 

याबाबत तक्रारदाराने १३ नोव्हेंबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. त्यानुसार १६ नोव्हेंबर रोजी पंचांसमक्ष या तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता, आरोपींनी ८० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले व पहिला हप्ता म्हणून ६० हजार रुपये देण्याचे ठरले.

 

सापळा रचून कारवाई:

१६ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी मारूती मंदिर येथील ‘हॉटेल कार्निवल’मधील रेस्टॉरंट बारमध्ये सापळा रचण्यात आला. प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप भुजबळ यांच्या सांगण्यावरून खाजगी इसम मिलिंद तुकाराम बनप (वय ५३, रा. रत्नागिरी) याने तक्रारदाराकडून ५० हजार रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली. त्यानंतर माहिती मिळाल्याने लाचलुचपत विभागाने खाजगी इसम मिलिंद बनप यास १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:२१ वाजता रक्कमेसह ताब्यात घेतले. तसेच १७ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२:१५ वाजता मुख्य आरोपी प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप विलासराव भुजबळ यांनाही ताब्यात घेण्यात आले.

 

याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (सुधारणा २०१०) कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

अधिकारी व पथक:

सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिमंडळाचे पोलीस अधीक्षक श्री. शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. भाग्यश्री सोनावणे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपअधीक्षक श्री. अविनाश आर्दराव पाटील, पोलीस निरीक्षक श्री. मच्छिंद्र जाधव व त्यांच्या पथकाने (ज्यात श्री. सुहास रोकडे, श्री. उदय चांदणे, श्री. संजय बापाटे, श्री. हेमंत पवार, श्री. आशिष बल्लाळ, श्री. श्रेया विचारे, श्री. राजेश गावणकर, श्री. अजिंक्य पवार यांचा समावेश होता) यशस्वीरीत्या पार पाडली.

 

नागरिकांना आवाहन:

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आव्हान केले आहे की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास किंवा लाचेची मागणी करणाऱ्या लोकसेवकांबाबत तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधावा.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें