यशदाच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची झाडगाव येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राला

यशदाच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची झाडगाव येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राला भेट

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य प्रशासकीय अधिकारी प्रशिक्षण व भेट दौऱ्यांतर्गत यशदा (पुणे) येथील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी झाडगाव (रत्नागिरी) येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राला भेट दिली. या दौऱ्यात परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक, गटविकास अधिकारी (बीडीओ), सहाय्यक राज्यकर आयुक्त आणि मुख्याधिकारी सहभागी झाले होते.

 

या भेटीदरम्यान प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी केंद्रातील मत्स्यालय व मत्स्यसंग्रहालयाची पाहणी केली, तसेच विविध मत्स्य प्रकल्पांची प्रत्यक्ष माहिती घेतली. यावेळी डॉ. अर्चना पवार आणि डॉ. वर्षा सदावर्ते यांनी अधिकाऱ्यांना मत्स्यालयातील विविध मासे आणि त्यांचे जैवविविधतेतील महत्त्व समजावून सांगितले.

 

तज्ज्ञांचे सविस्तर मार्गदर्शन

डॉ. केतन चौधरी (वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी) : यांनी भारतातील व महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसायाचे महत्त्व, निर्यातीतील वाटा आणि मच्छिमारांच्या समस्या यांवर प्रकाश टाकला. तसेच केंद्र व राज्य शासनाने सुरू केलेल्या विविध योजना आणि सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राच्या संशोधनाची उपयुक्तता याबाबत सविस्तर माहिती दिली.

 

प्रा. डॉ. आसिफ पागरकर (संशोधन अधिकारी) : यांनी मत्स्य प्रक्रिया, मासळीचे आहारातील महत्त्व, मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ निर्मितीसाठी विद्यापीठाने केलेले संशोधन आणि त्याचा मच्छिमारांना होणारा प्रत्यक्ष उपयोग याविषयी मार्गदर्शन केले.

 

या कार्यक्रमास प्रशिक्षण संयोजक व यशदा (पुणे) चे उपसंचालक श्री. शरद माळी उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें