उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांना ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२५’ पुरस्काराने सन्मानित!

उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांना ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२५’ पुरस्काराने सन्मानित!

 

मुंबई : महाराष्ट्राच्या उद्योग आणि मराठी भाषा क्षेत्रात भरीव योगदान देणारे मंत्री डॉ. उदय सामंत यांना यंदाचा प्रतिष्ठित ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२५’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईतील राजभवन, मलबार हिल येथे पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात राज्यपाल मा. सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला.

 

या सोहळ्यास मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, लोकमत समूहाचे अध्यक्ष मा. विजय दर्डा, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

जनतेच्या विश्वासाचा सन्मान!

या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करताना मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले,

“हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ वैयक्तिक सन्मान नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा प्रतीक आहे. तुमच्या पाठिंब्यानेच माझी ही सेवा सुरू आहे आणि पुढेही ती अधिक जोमाने सुरूच राहील.”

 

लोकमतच्या ऑनलाइन मतदानात प्रचंड पाठिंबा मिळाल्याबद्दल त्यांनी जनतेचे आणि आपल्या चाहत्यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच, रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघातील जनतेने सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून दिल्याबद्दल त्यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली.

 

उद्योग आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण योगदान

उद्योग धोरणांपासून ते मराठी भाषेच्या सशक्तीकरणापर्यंत विविध स्तरांवर भरीव कामगिरी करणाऱ्या डॉ. उदय सामंत यांच्या कार्याचा गौरव या पुरस्काराने करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीसह मराठी भाषेच्या जतनासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकाराचेही यानिमित्ताने कौतुक झाले.

 

या मोठ्या सन्मानानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातून डॉ. उदय सामंत यांच्यावर शुभेच्छांचार्षाव होत आहे.

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें