कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होणार मुंख्यमंत्री फडणविस यांची घोषणा अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईच्या मागणीला यश : श्री.यशवंत जडयार

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होणार मुंख्यमंत्री फडणविस यांची घोषणा अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईच्या मागणीला यश : श्री.यशवंत जडयार

मुंबई – कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करावे अशी मागणी अखड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईच्या वतीने अधिवेशनापूर्वी मुंख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती.लक्षवेधीमध्ये विधान परिषदेचे आमदार मा.श्री.प्रविण दरेकर साहेब यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुंख्यमंत्र्यांनी हे सांगितले.

कोकण रेल्वे कार्पोरेशनच्या निर्मितीच्या वेळी सर्वाधिक म्हणजे २२% गुंतवणूक ही महाराष्ट्र शासनाने केलेले आहे,कोकण रेल्वे ही स्वायत्त संस्था असल्याने त्याची देखभाल,दुरुस्ती व प्रस्थावित कामे निधीअभावी मागील २५ वर्षांपासून रखडलेली आहेत,परिणामी महाराष्ट्र राज्याच्या वाटयाला तुतारी एक्सप्रेस,दिवा सावंतवाडी एक्सप्रेस व दिवा रत्नागिरी पॅसेंजर अशा तीनच रेल्वे मिळाल्या.प्रवाशांना योग्य सेवा मिळत नाहीत किंवा त्यामध्ये अडथळे येत आहे,त्यामुळेच कोकण रेल्वेच्या २५ वर्षानंतरही विकासाला मर्यादा येत होत्या.यासाठीच अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुंख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस साहेब व माजी मुंख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब,श्री.उद्धव ठाकरे साहेब,कोकण रेल्वे,कोकणातील खासदार व केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याकडे सातत्याने कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून त्यातील महाराष्ट्रातील रोहा ते मडूरा दरम्यानचा भाग मध्य रेल्वेमध्ये समाविष्ठ करावा व सावंतवाडी टर्मिनसला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा.मधू दंडवते साहेब यांचे नाव देण्यात यावे असा ठराव अधिवेशनामध्ये पारित करून तो केंद्र सरकारकडे पाठवावा अशी मागणी प्रवासी संघटनेने सातत्याने केली होती असे सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार यांनी सांगितले.

केंद्रीय अर्थसंकल्पात कोकण रेल्वेचा समावेश होत नसल्याने निधी अभावी कोकण रेल्वेतील पायाभूत सुविधांच्या विकास कामांना खिळ बसलेली आहे.कोकण रेल्वे मार्गावर भारतीय रेल्वेपेक्षा प्रवासी वहातुकीवर ४०% तर मालवहातुकीवर ५०% जास्तीचा अधिभार लावलेला आहे. जास्त प्रवासभाडे देऊनही प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळत नाहीत.कोकण रेल्वे मार्गावर निधी अभावी कोकण रेल्वेचे दुहेरीकरण,सावंतवाडी रोड टर्मिनस, संपूर्ण प्लाटफॉर्मवर शेड,सरकते जिने,रेल्वे ब्रीज,पिण्याचे पाणी,प्लाटफॉर्मची उंची,इंडीकेटर अशी अनेक कामे मागील २५ वर्षापासून रखडलेली आहेत.याचा परिणाम कोकणात सुसज्ज टर्मिनस नसल्याने मागणी करूनही वसई सावंतवाडी पॅसेंजर,कल्याण सावंतवाडी पॅसेंजर व दादर रत्नागिरी इंटरसिटी एक्सप्रेस ह्या जादाच्या रेल्वे कोकणवासियांना मिळत नाही आहेत.

कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची संख्या वाढल्याने नियमीत रेल्वे प्रवाशांच्या तुलनेत कमी पडत आहेत.यासाठी कोकण रेल्वेचे डबलींग होणे खूप आवश्यक आहे मात्र त्यासाठी मोठया प्रमाणात निधीची आवश्यकता आहे ते ह्या स्वायत्त संस्थेला शक्य नाही म्हणून कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करणे आवश्यक आहे असे अध्यक्ष श्री.शेखर बागवे यांनी सांगितले.

सध्या कोकण रेल्वेवर ६ हजार कोटींचे कर्ज आहे,त्यामुळेच कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण झाल्यास शासनाच्या वतीने रखडलेल्या कामांसाठी निधी मंजूर करून ती लवकरात लवकर पूर्ण केली जातील,त्याच्याने अत्यंत महत्वाचा सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्नही मार्गी लागेल तसेच येथे नवीन रेल्वे गाड्याही वाढवता येतील.कोकण रेल्वेच्या विलीनीकरणा संदर्भात गोवा,कर्नाटक व केरळ राज्यांप्रमाणे महाराष्ट्र विधिमंडळात तसा ठराव पारित करून महाराष्ट्र शासनाची २२% गुंतवणूक ही केंद्र सरकारला हस्तांतरित करावी तसेच कोकण रेल्वेचा महाराष्ट्रातील रोहा ते मडूरा दरम्यानचा भाग हा भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यासाठी आपण केंद्राकडे शिफारस करावी,अशीही निवेदनाद्वारे मुंख्यमंत्र्याकडे मागणी करण्यात आली आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें