राजापूरच्या समृध्दी नार्वेकरने दिवाणी न्यायाधीश परीक्षेत मिळवले घवघवीत यश!

राजापूरच्या समृध्दी नार्वेकरने दिवाणी न्यायाधीश परीक्षेत मिळवले घवघवीत यश!

 

✍️राजू सागवेकर/राजापूर 

 

▪️ कठोर परिश्रम आणि दुर्दम्य जिद्दीच्या जोरावर राजापूरच्या समृध्दी प्रशांत नार्वेकर हिने दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. राज्यात तिने तिसरा क्रमांक पटकावत तर इंटरव्यू फेरीत प्रथम क्रमांक मिळवत कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.

▪️ समृध्दीने आपले शालेय शिक्षण राजापूर येथे पूर्ण केले. कोल्हापूरच्या शहाजी लॉ कॉलेजमधून पाच वर्षांचे B.S.L.L.L.B. शिक्षण पूर्ण करून पुढे दोन वर्षे दिवाणी न्यायाधीश परीक्षेची तयारी केली. या प्रवासात तीने सोशल मीडियापासून तीन वर्षे संपूर्ण दूर राहून अभ्यासाला प्राधान्य दिले.

▪️ या यशाबद्दल तिचे संपूर्ण राजापूरमध्ये अभिनंदन होत असून, पोलिस अधिकारी, राजकीय नेते, शिक्षक आणि कुटुंबीयांनी तिच्या घरी भेट देऊन तिचा सत्कार केला. या यशाचे श्रेय तिने आपल्या आजी, आई-वडील आणि गुरुजनांना दिले आहे. विशेष म्हणजे तिची आजी श्रध्दा रांगणेकर या देखील न्यायाधीश होत्या, त्यांच्याच प्रेरणेतून समृध्दीने हे ध्येय निश्चित केले.

▪️ समृध्दी नार्वेकरच्या यशामुळे राजापूरच्या युवक-युवतींसाठी ती एक प्रेरणास्त्रोत ठरली असून, तिच्या जिद्दीला आणि परिश्रमाला सर्व स्तरांतून मान्यता मिळत आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें