चिपळूण मध्यवर्ती बस स्थानकाच्या बांधकामासाठी २ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

चिपळूण मध्यवर्ती बस स्थानकाच्या बांधकामासाठी २ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर

परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हिरवा कंदील

आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश

 

चिपळूण -हायटेक धर्तीवर बांधण्यात येत असलेल्या चिपळूण मध्यवर्ती बस स्थानकाच्या बांधकामासाठी आ. शेखर निकम यांच्या प्रयत्नांना यश आले असून निधीसाठी मुंबई येथे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्या दालनात झालेल्या बैठकीत या बस स्थानकाच्या बांधकामासाठी २ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याची निविदा प्रक्रियेची कार्यवाही लवकरच होणार असल्याने रखडलेल्या हायटेक मध्यवर्ती बस स्थानकाच्या बांधकामाचा आणखीनच मार्ग मोकळा झाला आहे.
चिपळूण मध्यवर्ती बस स्थानकाची इमारत तोडून त्या जागी नव्याने बस स्थानक बांधण्यास काही वर्षांपूर्वी प्रारंभ झाला. यानंतर ठेकेदार व एस.टी. महामंडळ यांच्या उदासीन भूमिकेमुळे या बस स्थानकाच्या बांधकामाचा सुरुवातीपासूनच बट्ट्याबोळ उडाला. इमारतीच्या पायाचे काम परवडत नसल्याने त्यावेळच्या ठेकेदाराने बांधकाम अर्धवट सोडून दिले होते. यानंतर एस.टी. महामंडळाने त्या ठेकेदाराचा ठेका रद्द करून पुनर्बांधणीची नवीन निविदा काढली. नव्या ठेकेदाराची नियुक्ती केल्यानंतर त्याने पाया तसेच पहिल्या स्लॅबचे बांधकाम पूर्णत्वास नेले. मात्र, काही महिन्यांपासून हे बांधकाम बंद अवस्थेत आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याने या प्रश्नी आमदार शेखर निकम यांनी परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्याकडे रखडलेल्या बस स्थानकासंदर्भात वाढीव निधीची तरतूद करावी व यासाठी बैठकीची आयोजन करावे, तसे पत्रे दिले होते. या मागणीनुसार गुरुवारी मुंबई येथे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत चिपळूणमध्ये रखडलेल्या हायटेक मध्यवर्ती बस स्थानक प्रश्न चर्चा झाली यानंतर ना सरनाईक यांनी या प्रस्तानकाच्या बांधकामासाठी २ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीच्या अनुषंगाने येत्या काही दिवसातच निविदा प्रक्रिया पूर्णत्वास जाऊन रखडलेल्या बस स्थानकाच्या कामाला वेग मिळणार आहे. तसेच चिपळूण शहरातील जुन्या स्टॅन्डची दुरावस्था झाली असून या स्टॅंडचे सुशोभीकरण व्हावे तसेच परिसर विकसित व्हावा, अशी मागणी आ. शेखर निकम यांनी परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्याकडे केली. यावर ना. सरनाईक यांनी एस.टी. महामंडळाच्या बांधकाम प्रशासनाला आराखडा बनवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात सावर्डे बस स्थानक तोडण्यात आले आहे. या बस स्थानकाची पुनर्बांधणी व्हावी, असा देखील मुद्दा आ. शेखर निकम यांनी यावेळी उपस्थित केला. या बस स्थानकाला देखील परिवहन मंत्री ना. सरनाईक यांनी सकारात्मकता दाखवत आराखडा बनवण्याचे आदेश दिले आहेत.
यावेळी आमदार शेखर निकम यांच्यासह महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे बांधकाम महाव्यवस्थापक दिनेश महाजन, कोकण विभागीय बांधकाम कार्यकारी अभियंता सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण तालुका अध्यक्ष नितीन ठसाळे आदी उपस्थित होते.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात