API अश्विनी बिद्रेचे तुकडे करणारा PI कुरुंदकरच, महाराष्ट्राला हादरवणाऱ्या हत्याकांडाचा 9 वर्षानंतर निकाल

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

API अश्विनी बिद्रेचे तुकडे करणारा PI कुरुंदकरच, महाराष्ट्राला हादरवणाऱ्या हत्याकांडाचा 9 वर्षानंतर निकाल

नवी मुंबई (मंगेश जाधव).

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. मागील सात वर्षांपासून या प्रकरणावर कोर्टात सुनावणी सुरू होती. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर पनवेल सत्र न्यायालयाचे न्यायाधीश केजी पांडेवाल यांनी निकाल सुनावला आहे. या प्रकरणी न्यायालयाने अभय कुरुंदकर हाच मुख्य दोषी असल्याचं म्हटलं आहे. तो कलम ३०२ अंतर्गत दोषी आढळला आहे. महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांनी मृतदेहची विल्हेवाट लावण्यासाठी सहभागी असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. तर आरोपी राजू पाटील याची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 11 एप्रिल रोजी होणार आहे.

*हत्येच्या दिवशी नक्की काय घडलं?*

अश्विनी ब्रिदे 11 एप्रिल 2016 रोजी बेपत्ता झाल्या होत्या. घटनेच्या दिवशी सायंकाळी सातच्या सुमारास त्या अभय कुरूंदकरला भेटायला पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. यानंतर अभय कुरूंदकर हे बिद्रे यांना कारमध्ये घेऊन भाईदरच्या दिशेने रवाना गेला. याचवेळी कारमध्येच कुरूंदकरने बिद्रे यांची गळा दाबून हत्या केली. त्यावेळी त्याच्यासमवेत महेश फळणीकर असल्याचं देखील समोर आलं होतं. ही घटना 11 एप्रिल 2016 रोजी सायंकाळी 6. 41 ते रात्री 11.11 च्या दरम्यान घडली. त्यानंतर रात्री 11.18 वाजता बिद्रे यांचा मोबाईल बंद झाला. हत्या केल्यानंतर आरोपीनं लाकडं कापायच्या कटरने अश्विनी यांच्या शरीराचे तुकडे केले. कुरूंदकर आणि फळणीकरने राजू पाटील आणि खासगी चालकाला सोबत घेत मध्यरात्री अश्विनी बिद्रेचे तुकडे कारमधून वसईच्या खाडीत फेकला.

नेमकी हत्या कशामुळे झाली?

अश्विनी बिद्रे या २००५ मध्ये पोलीस दलात रुजू झाल्या होत्या. त्या सांगलीत पोस्टिंग असताना मुख्य आरोपी अभय कुरुंदकरशी त्यांची ओळख झाली होती. दोघंही विवाहित असून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. अश्विनी बिद्रे आणि अभय कुरूंदकर दोघांनाही मुलं होती. कुरूंदकरने आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन बिद्रे यांच्यासोबत लग्न करण्याचे वचन दिले. त्यामुळे अश्विनी यांनी पती राजू गोरे यांच्यासोबतचे संबंध तोडले. अश्विनीला राजू गोरेपासून एक मुलगी आहे. जी आपल्या पित्याकडे राहते.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात