लेखकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे – डॉ. गोपाल सहर

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लेखकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे – डॉ. गोपाल सहर

 

छत्रपती शिवाजी विद्यापीठात ‘साहित्य संवाद’ कार्यक्रमात मनमोकळी चर्चा; ‘गुजरात डायरी’वरील दबावासह अनुभव कथन

बातमी.. मंगेश जाधव.

कोल्हापूर – “लेखकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य सरकारने घटनेनुसार अबाधित ठेवावे,” असे स्पष्ट मत ज्येष्ठ साहित्यिक, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त डॉ. गोपाल सहर यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या हिंदी विभागात आयोजित ‘साहित्य संवाद’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

 

या कार्यक्रमासाठी डॉ. सहर यांच्यासोबत प्रसिद्ध साहित्यिक बाळासाहेब लबडे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. हिंदी विभाग प्रमुख, प्राध्यापकवर्ग आणि विद्यापीठातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. प्रकाश मुंज होते.

 

या संवादात गोपाल सहर यांनी त्यांच्या साहित्य प्रवासातील अनुभव, निर्माण प्रक्रिया, सामाजिक बांधिलकी याविषयी मोकळेपणाने विचार मांडले. त्यांच्या ‘गुजरात डायरी’ या पुस्तकावरील शासकीय दबावामुळे त्यांच्यावर पगार बंदीची कारवाई कशी झाली, याविषयीही त्यांनी अनुभव कथन केले. त्यांनी सांगितले की, “लेखकाने अनुभवातून आणि संवेदनशीलतेतून साहित्य निर्माण करावे, राजकीय सत्तेच्या दबावापुढे झुकू नये.”

 

तसेच, ‘खुला लिफाफा’, ‘कुछ यूं बुनते हुए’ आणि ‘शब्दों का सौदागर’ यासारख्या पुस्तकांची निर्मिती प्रक्रिया त्यांनी उलगडून दाखवली. तंत्रज्ञानामुळे मानवी भावनांमधील तफावत वाढली असून, साहित्यच माणसाला माणूस ठेवण्याचे कार्य करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

कार्यक्रमानंतर उपस्थितांनी वि.स. खांडेकर स्मृती संग्रहालयाला भेट दिली. हिंदी विभागाच्या वतीने या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आणि आभारप्रदर्शन करण्यात आले.

 

हॅशटॅग्स:

#साहित्यसंवाद #गोपालसहर #गुजरातडायरी #अभिव्यक्तीस्वातंत्र्य #छत्रपतीशिवाजीविद्यापीठ #KolhapurNews #HindiSahitya

 

फोटो

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]