आजी माजी विद्यार्थी (आडिवरे हायस्कुल ) करियर मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

आजी माजी विद्यार्थी( आडिवरे हायस्कुल ) करियर मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

 मुलगा साने गुरुजींसारखा घडवायचा असेल तर आत्ताच्या सर्व आईनी “श्यामची आई’ बना – सदानंद पुंडपाळ सर

विरार – संदीप शेमणकर

‘मुलगा सानेगुरुजींसारखा घडवायचा असेल तर आताच्या सर्व आईंनी ‘श्यामची आई’ बना,’ असा अनमोल सल्ला माननीय सदानंद पुंडपाळ सर यांनी दिला. इतकेच नव्हे तर श्यामची आई हे पुस्तक जरूर वाचा, असाही सल्ला त्यांनी दिला. मूल हे संवेदनशील असतं, त्याच्याकडे बुद्धिमत्ता असते, ही बुद्धिमत्ता आई – वडिलांना ओळखता आली पाहिजे. मुलाचे गुण ओळखता आले की, आपला मुलगा किंवा मुलगी कोण होणार आहे, त्याला काय घडवू शकतो, हे पालकांना समजू शकते, असेही पुंडपाळ सर यांनी सांगितले. माझे विद्यार्थी हीच माझी मोठी संपत्ती आहे, असेही पुंडपाळ सर यांनी सांगितले.

श्री. महाकाली इंग्लिश स्कूल नवेदर आडिवरे या हायस्कूलच्या आजी – माजी विद्यार्थ्यांतर्फे माननीय पुंडपाळ सर यांचा करिअर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा करिअर मार्गदर्शन कार्यक्रम 15 जून 2025 रोजी विरार येथील शास्त्री विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. यासाठी सर्व आजी – माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला होता. या कार्यक्रमात पुंडपाळ सर यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करतानाच तुम्ही नवीन आव्हानांना कसे सामोरे जाल आणि भविष्यात कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत याची परिपूर्ण माहिती दिली. कला, वाणिज्य, विज्ञान शाखांसोबतच विविध पदविका अभ्यासक्रमांबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली. अभ्यासाबरोबरच प्रेझेंटेशन, व्यक्तिमत्व विकास यांसारख्या गोष्टीही जीवनात महत्त्वाच्या असतात आणि त्यासाठी किती मेहनत, कष्ट घ्यावे लागतात याविषयी त्यांनी उपस्थिती विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधला.

पुंडपाळ सर 1976 मध्ये आडिवरे हायस्कूलध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. कोकणात येऊन शिक्षक व्हावे असे पुंडपाळ सर यांचे स्वप्न होते. साने गुरुजी आणि वि. स. खांडेकर यांचे साहित्य वाचून आपण कोकणात जावे असे वाटत होते. मा. चव्हाण सर यांच्यामुळे आडिवरे हायस्कूलमध्ये शिक्षक झालो आणि आज तुम्हाला सर्वांना पाहून सर्व सार्थक झाले आहे असे वाटते, असेही पुंडपाळ सर यांनी सांगितले.

श्री. महाकाली इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात त्यांनी गेली 32 वर्षं पर्यवेक्षक म्हणून सेवा केली. आडिवरे हायस्कूल, विद्यार्थी आणि आडिवरे परिसरातील भरभरून प्रेम देणाऱ्या लोकांविषयी पुंडपाळ सरांनी आठवणी जागवल्या. उत्तूर ही जन्मभूमी असली तरी आडिवरे ही कर्मभूमी आहे, असेही त्यांनी सांगितले. माझा विद्यार्थी मागे राहता कामा नये, त्याने खूप शिकावे आणि मोठे व्हावे या भावनेतूनच विद्यार्थ्यांना ओरडत असे, मारत असे, अशाही भावना पुंडपाळ सरांनी व्यक्त केल्या.

आडिवरे सोडतानाची पुंडपाळ सरांनी सांगितलेली आठवण डोळ्यात पाणी आणणारी होती. ‘सेवानिवृत्तीनंतर आडिवरे सोडवण्याचे ठरले. ही गोष्ट अनेकांनी माहिती पडली. जो भेटे तो म्हणे, सर तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका, आमच्या मुलांचे कसे होणार, आम्ही तुम्हाला जागा देतो, तुम्ही आडिवऱ्यातच घर बांधा आणि राहा. पण जाऊ नका. जड्यार गुरुजी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी खास असे ऋणानुबंध निर्माण झाले होते. आम्ही आडिवरे सोडणार हे कळल्यानंतर त्यांच्या घरचे वातावरण बदलले. त्यांच्या घरी धड जेवणही बनवले जात नव्हते. शेवटी टेम्पो निघाला. जड्यार गुरुजींनी मिठी मारली आणि दोघांच्या डोळ्यांतून पाणी आलं. टेम्पोतून जातानाही खाली मान घातली. कुणी भेटला आणि विचारले, सर कुठे जाता ? तर त्यांना काय सांगू, असे मनात यायचे आणि डोळ्यांसमोर आडिवऱ्याचा इतिहास, येथील भरभरून प्रेम देणारी माणसं, माझी शाळा, माझे विद्यार्थी आठवयाचे. आडिवऱ्याने मला खूप काही दिलं. त्या ऋणानुबंधात राहायला आवडेल.’ अशा आठवणी पुंडपाळ सरांनी जागवल्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुणबी समाज आडिवरे – कशेळी – गावखडीचे अध्यक्ष प्रभाकर वारीक होते. तसेच यावेळी व्यासपीठावर येऊन अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुंडपाळ सरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला अनेक आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते. आपल्या विद्यार्थ्यांची मुलेही उपस्थित राहिल्याने मन भरून आले, अशा भावनाही पुंडपाळ सरांनी व्यक्त केल्या. करिअर मार्गदर्शन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज वारीक यांनी अतिशय उत्तमपणे केले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें