भू अभिलेख विभागाची डिजिटल क्रांती : सातबारा, ८ अ उतारा आणि ई-रेकॉर्ड्स आता थेट व्हॉट्सअ‍ॅपवर!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

📰 भू अभिलेख विभागाची डिजिटल क्रांती : सातबारा, ८ अ उतारा आणि ई-रेकॉर्ड्स आता थेट व्हॉट्सअ‍ॅपवर!

नागरिकांना कागदपत्रांसाठी आता कार्यालयात चकरा मारण्याची गरज नाही; मोबाईलवरच मिळणार दस्तऐवज

पुणे : राज्यातील नागरिकांसाठी भू अभिलेख विभागाने मोठी डिजिटल झेप घेतली असून सातबारा, ८ अ उतारा, ई-रेकॉर्ड यांसारखी जमीनसंबंधीची कागदपत्रे आता थेट मोबाईल आणि व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार आहेत. या सेवेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना कार्यालयीन फेऱ्या मारण्याची गरज नाही.

ही सेवा ई-महाभू‍मि पोर्टल आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे सुरू करण्यात आली असून, ती तीन स्तरांवर नागरिकांना उपलब्ध होईल – माहिती, प्रत आणि सूचना.–

📱 मोबाईलवर मिळणार सातबारा

महाभूमी संकेतस्थळावर मोबाइल क्रमांक नोंदवून १५ रुपयांमध्ये डिजिटल सातबारा उतारा मिळू शकतो. हा उतारा पीडीएफ स्वरूपात मोबाईल, ईमेल व व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार आहे.

🔍 तीन टप्प्यांत सेवा

1. माहिती: नागरिकांना विविध शंका व चौकशीसाठी लागणारी प्राथमिक माहिती.

2. प्रमाणित प्रत: ई-सातबारा, ई-८ अ उतारा, ई-रेकॉर्ड यांची डिजिटल साक्षांकित प्रत.

3. सूचना: जमिनीवरील विविध बदलांविषयी थेट अलर्ट व अपडेट मिळणार.

सेवेचे फायदे

कार्यालयात चकरा टळणार

वेळ आणि पैशांची बचत

फसवणुकीला आळा

डिजिटल पुराव्यासह दस्तऐवज सहज

 

🏷️ #डिजिटलसातबारा #महाभूमी #सातबारा८अ #eRecords #भूअभिलेख #WhatsAppService #LandRecords #RatnagiriVartahar

 

 

📸 फोटो

 

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...