वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

*वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन..

गुहागर -( सुजीत सुर्वे ,वार्ताहर) तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती सामाजिक समता दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी वेलदूर ग्रामपंचायतीचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिक्षणतज्ञ शंकर कोळथरकर, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी ग्रामस्थ सुवर्णा कोळथरकर, विशाखा नाटेकर, मुख्याध्यापक डॉ. मनोज पाटील, शाळेतील शिक्षक वृंद अंजली मुद्दमवार, धन्वंतरी मोरे,सुषमा गायकवाड,अफसाना मुल्ला,पालक, ग्रामस्थ,विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेचे मुख्याध्यापक डॉ. श्री. मनोज पाटील यांनी भूषवले.

वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

कार्यक्रमाचे प्रास्ताविक धन्वंतरी मोरे यांनी केले. विद्यार्थी प्रतिनिधी आरोही रोहीलकर व शिक्षिका सुषमा गायकवाड यांनी शाहू महाराजांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले.तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर कोळथरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राजर्षी शाहू महाराज यांचे विचार आपणा सर्वांसाठी दीपस्तंभ प्रमाणे मार्गदर्शक असल्याचे सांगितले.जीवनात प्रगती करण्यासाठी शिस्त महत्त्वाची असून विद्यार्थ्यांनी वाचनाचा व्यासंग जपला पाहिजे.शाहू महाराज हे आरक्षणाचे प्रणेते असून त्यांचे सामाजिक व शैक्षणिक योगदान हे अत्यंत मोलाचे आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. मनोज पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य तसेच बहुजन समाजाला स्वाभिमानाने नवे जीवन देणारे आरक्षण प्रणेते शाहू महाराजांच्या थोर कार्याबद्दल मार्गदर्शन केले. शाहू महाराज यांचे विचार देशाला पुढे नेणारे आहेत . शाहू महाराज यांनी महाराष्ट्राला पर्यायाने देशाला प्रगतीपथावर नेले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अफसाना मुल्ला आणि आभार प्रदर्शन अंजली मुद्दमवार यांनी केले. छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य या विषयावर शाळेत निबंध आणि वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेत विद्यार्थांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. पहिली ते चौथी निबंध स्पर्धा या गटामध्ये प्रथम क्रमांक प्रान्सी कोळथरकर, द्वितीय क्रमांक स्वरा फुणगुसकर, तृतीय क्रमांक काव्या रोहिलकर तसेच पाचवी ते सातवी गटामध्ये प्रथम क्रमांक अनिश पालशेतकर, द्वितीय क्रमांक अनघा जांभारकर व तृतीय क्रमांक अमेय जांभारकर आणि पहिली ते चौथी वक्तृत्व स्पर्धा या गटामध्ये प्रथम क्रमांक शिवन्या पालशेतकर, द्वितीय क्रमांक प्रान्सी कोळथरकर, तृतीय क्रमांक क्षितिज वरवटकर तसेच पाचवी ते सातवी या गटामध्ये प्रथम क्रमांक आरोही रोहीलकर, द्वितीय क्रमांक अन्वी जांभारकर, तृतीय क्रमांक शुभ्रा कोळथरकर असे क्रमांक काढण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न कॉलेजमधल्या जुन्या आठवणींना उजाळा आणि पुनर्भेटीला कटिबद्ध आबलोली (संदेश कदम) निसर्गरम्य परिसर,...
Read More
गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

*साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार "दिनकर सन्मान" सोहळा उत्साहात संपन्न   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा...
Read More
साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

*अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): दहावीच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर...
Read More
अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतून रस्ता पूर्ण; लवकरच डांबरीकरणासाठी निधी देणार...
Read More
मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा!- वैभव नाईक    रविंद्र चव्हाण...
Read More
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन   *प्रबोधनपर व्याख्याने, सत्कार सोहळा...
Read More
खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी,  महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी

■ ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी....।* ■ समिर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर:- तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी अधिकारी...
Read More
ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी