पाटपन्हाळे विद्यालयात गुणवंतांचा सत्कार: मिहिर पुरोहित आणि नेहा निवाते शिष्यवृत्तीधारक

पाटपन्हाळे विद्यालयात गुणवंतांचा सत्कार: मिहिर पुरोहित आणि नेहा निवाते शिष्यवृत्तीधारक

आबलोली (संदेश कदम): शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ च्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा (Scholarship Exam) निकाल नुकताच जाहीर झाला असून, गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पाटपन्हाळे (Patpanhale Vidyalaya) यांनी या परीक्षेत मोठे यश संपादन केले आहे.

इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत मिहिर समीर पुरोहित याने सर्वसाधारण गटात १०२ वा क्रमांक पटकावला आहे. तर, इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत नेहा संदीप निवाते हिने ग्रामीण सर्वसाधारण गटात ८१ वा क्रमांक मिळवून शिष्यवृत्ती संपादन केली आहे.

यासोबतच, डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत (Dr. Homi Bhabha Bal Vaidnyanik Competition) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या इयत्ता १० वीची विद्यार्थिनी कुमारी मृण्मयी दत्ताराम जाधव हिचेही प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी या विद्यालयातून अनेक विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी मिहिर पुरोहित, नेहा निवाते, तसेच मृण्मयी जाधव आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचा मुख्याध्यापिका सौ. एस. एस. चव्हाण, पर्यवेक्षक जी. डी. नेरले आणि इतर शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 

 

 

#PatpanhaleVidyalaya #ScholarshipExam #गुहागर #शिक्षण #गुणवंतविद्यार्थी #HomiBhabhaCompetition #मिहिरपुरोहित #नेहानिवाते #मृण्मयी

जाधव

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें