दळेतील त्या नियमबाह्य ग्रामसभेचा सुनावणी अहवाल कोकण आयुक्तांकडे सादर

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दळेतील त्या नियमबाह्य ग्रामसभेचा सुनावणी अहवाल कोकण आयुक्तांकडे सादर

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९(१) नुसार कारवाई साठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली शिफारस

सरपंच महेश करगुटकर, आणि उपसरपंच सुविधा खडपे यांच्या मनमानी कारभाराला बसणार आळा

समिर शिरवडकर-रत्नागिरी.

 

राजापूर:-( दळे) :- राजापूर तालुक्यातील *मनमानी कारभार* ने गाजलेली ग्रामपंचायत दळे मधील ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ७ ची पायमल्ली करून,आपल्या अधिकारात लावलेल्या याआधी च्या सर्व सभा, परंतु महसूल गाव होळी जवळपास दहा वर्ष सभाच झाली नसून,या वेळी मात्र ग्रामसभा ससदस्य च्या मागणीनुसार लावण्यात यावी,व नियमबाह्य ऑगस्ट २०२४ ची सभा बाबत कारवाई साठी सर्व होळी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी राजापूर यांकडे पत्र दिले होते,त्या पत्रानुसार दि.२६ ऑगस्ट २४ ला ग्रामपंचायत दळे च्या कार्यलयात विस्तार अधिकारी समवेत सुनावणी संपन्न झाली होती.चौकशी तथा विस्तार अधिकारी ( सा.) हुलगुढे यांच्या अहवालात सरपंच महेश मोरेश्वर करगुटकर सह उपसरपंच, आणि ग्रामविकास अधिकारी हे दोषी ठरले होते.

सदर,अहवालावर दि. ०३ जुलै २०२५ रोजी दुपारी १२.०० सुनावणी झाली या वेळी समंदीत सर्व अधिकारी सरपंच,ग्रामविकास अधिकारी, होळी ग्रामस्थ उपस्थित होते,त्यानुसार दि.१५ जुलै २०२५ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कोकण आयुक्तां कडे कारवाई साठी अहवाल दिला आहे.

■ 👉🏻काय आहे अहवाल

सदर प्रकरणी, दि.१२.०८.२०२४ च्या ग्रामसभेच्या अजेंड्याप्रमाणे ग्रामसभेचे बैठकीचे ठिकाण जि.प.शाळा तुळसुंदेवाडी गाव होळी असे आहे. ग्रामसभेच्या अजेंड्यावर ग्रामसेवक व सरपंच यांच्या ऐवजी ग्रामसेवक व उपसरपंच यांच्या सह्या आहेत. सरपंच यांच्या म्हणण्यानुसार ग्रामसभेचा अजेंडा काढतेवेळी ते रजेवर होते. मात्र रजेचा अर्ज ग्रामपंचायतीकडे सादर केलेला नाही. सदरची सभा दि. २३.०८.२०२४ रोजी कोरम अभावी तहकूब घोषित करण्यात आली व सभा हि दि.३०.०८.२०२४ रोजी त्याच ठिकाणी घेण्याचे अध्यक्ष पदावरुन घोषित करण्यात आले आणि सदर सभेचे अध्यक्ष हे सरपंच श्री. महेश करंगुटकर होते. तक्रारदार श्रीम. सरिता बाळकृष्ण गुरव व इतर ग्रामस्थ यांनी ग्रामसभा हीनियमानुसार दळे येथे घेण्याची विनंती केली होती. मात्र सरपंच यांनी त्यांची मागणी फेटाळली आणि मनमानी करुन ग्रामसभा तुळसूनदे होळी गावी घेतली अशी तक्रारदार यांची तक्रार आहे.

 

मुंबई ग्रामपंचायत (ग्रामसभेच्या बैठकी) नियम १९५९ नुसार इतर गावात ग्रामसभेच्या बैठकी घेताना त्या गावांची नावे इंग्रजी वर्णानुक्रमे जशी असतील त्याप्रमाणे घेणे आवश्यक होते. ग्रामस्थांच्या मागणी प्रमाणे दळे येथे सभा घेणे आवश्यक होते. परंतू तशी मागणी असूनही ग्रामपंचायतीकडून फेटाळण्यात आलेली आहे. त्यामुळे तळसुंदे गावी लावण्यात आलेली ग्रामसभा नियमबाह्य ठरते, तसेच सचिव यांनी सदरबाबत सरपंच यांना योग्य ते कायदेशीर मार्गदर्शन केल्याचे दिसून येत नाही. तसेच सरपंच श्री. महेश करंगुटकर यांच्या म्हणण्यानुसार ग्रामसभा अजेंड्यावर त्यांनी सही केलेली नाही. त्यामुळे ग्रामसभेचे ठिकाण त्यांनी ठरवलेले नाही.

 

सदर प्रकरणी सरपंच श्री. महेश करंगुटकर यांनी पंचायती कडून आगावू रजा मंजूर करुन रजेवर जाणे आवश्यक असताना तशाप्रकारे कोणतीही कार्यवाही केलेली नाही. सरपंच यांनी नियमबाह्य ठिकाणी लावण्यात आलेला ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून कामकाज केलेले आहे. त्यामुळे सरपंच, ग्रापं. दळे हे प्रथमदर्शनी दोषी दिसून येत आहेत. तसेच कार्यरत उपसरपंच यांनी सरपंच पदाचा कार्यभार नसतानाही ग्रामसभेच्या अजेंड्यावर स्वाक्षरी करुन नियमबाह्य ठिकाणी सभा आयोजित केलेले असल्याने श्रीम. सुविधा विवेक खडपे, उपसरपंच, ग्रापं. दळे हे दखील प्रथमदर्शनी दोषी आढळून येत आहेत. तसेच कार्यरत ग्रामसेवक श्री. गोरक्ष शेलार यांनी ग्रामपंचायतीची ग्रामसभा आयोजित करताना कार्यरत सरपंच यांचे स्वाक्षरीने ग्रामसभेचा अजेंडा प्रसिध्द करणे अपेक्षित असताना नियमबाह्य पणे उपसरपंच यांचे स्वाक्षरीने ग्रामसभा अजेंडा काढलेला असून ग्रामसभेचे ठिकाण ठरविताना देखील नियमाबाह्य कार्यवाही केलेली असल्याने ग्रामसेवक देखील प्रथमदर्शनी दोषी आढळून येत आहेत.

वरीलप्रमाणे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांनी कर्तव्यात कसूर केलेली असल्याने सरपंच व उपसरपंच ग्रापं. दळे हे दोषी आढळून येत असल्याने त्यांचेवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९(१) नुसार कारवाई प्रस्तावित होणेसाठी शिफारस करणेत येत आहे.त्यावर कोकण आयुक्त काय निर्णय देतील याकडे लक्ष्य लागलें आहे.

राजापूर तालुक्यातील दळे ग्रामपंचायतीमधील नियमबाह्य ग्रामसभेप्रकरणी कोकण आयुक्तांकडे सुनावणी अहवाल सादर करण्यात आला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३९(१) नुसार कारवाई करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिफारस केली आहे. यामुळे सरपंच महेश करगुटकर आणि उपसरपंच सुविधा खडपे यांच्या मनमानी कारभाराला आळा बसण्याची शक्यता आहे.

 

 

#Rajapur #GramPanchayat #Corruption #Dalegrampanchayat #Konkan #Commissioner #Investigation #Misconduct #Sarpanch #Upsarpanch #Gramsevak #MaharashtraGrampanchayatAct1958 #राजापूर #ग्रामपंचायत #दळेग्रामपंचायत #कोकणआयुक्त #चौकशी #गैरकारभार #सरपंच #उपसरपंच #ग्रामसेवक #महाराष्ट्रग्रामपंचाय

तअधिनियम१९५८

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा