शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये उत्साहात राबविण्यात आला

शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये उत्साहात राबविण्यात आला

 

नवी मुंबई (मंगेश जाधव वेळबंकर) – स्व. बाळासाहेब खेतले प्रतिष्ठान आणि भूमिपुत्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५ जुलै २०२५ रोजी गुहागर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.

 

या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळा उभळे विराटवाडी येथील १५ विद्यार्थ्यांना आणि जिल्हा परिषद शाळा पालपेन येथील १०७ विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

 

उपक्रमास स्व. बाळासाहेब खेतले प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. प्रदीपजी खेतले आणि भूमिपुत्र प्रतिष्ठानचे सचिव मा. संदीपजी खैर साहेब व उमेशजी खैर साहेब यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासोबत रघुनाथ पोस्टुरे, संतोष पोस्टुरे, दिनेेश झगडे, मितेश घडशी, काशिराम पाष्टे, विठ्ठल शिगवण, वसंत खेडेकर, अविनाश माटल, तेजस फटकरे, महेश बोरले व कुणाल खाकम या कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.

 

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामीण भागातील शिक्षण प्रक्रियेस चालना देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें