रामभाऊ बेंडल साहेबांच्या विचारांचा वारसा आंम्ही पुढे चालवू – साहिल आरेकर

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रामभाऊ बेंडल साहेबांच्या विचारांचा वारसा आंम्ही पुढे चालवू – साहिल आरेकर

आबलोली (संदेश कदम) 

लोकनेते,स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेबांना मी प्रत्यक्षात पाहिले नसले तरी त्याचे सामाजिक आणि राजकीय कार्य उल्लेखनीय आहे. लोकनेते,आमदार,स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेबांच्या लोकोपयोगी विचारांचा वारसा आंम्ही पुढे चालवू असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष साहिल आरेकर यांनी व्यक्त केले. गुहागर तालुक्यातील कुणबी समाजाचे उद्धारकर्ते, लोकनेते,माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेब यांचा ३१ वा स्मृतिदिन आणि आदरांजली सभा शृंगारतळी येथे गुहागर बाजार येथील लोकनेते, माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ बेंडल सभागृहात कुणबी समाजोन्नती संघ , शाखा तालुका गुहागर ग्रामीण या शाखेचे अध्यक्ष पांडुरंग पाते यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला. Sahil

यावेळी मान्यवरांच्या हस्ते लोकनेते, स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीपप्रज्वलीत करुन प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष साहिल आरेकर यांनी लोकनेते,स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेब यांना अभिवादन करताना माझे आजोबा कै. सदाशेठ आरेकर, लोकनेते स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेब आणि माजी आमदार डॉ. तात्यासाहेब नातू यांच्या कार्याचा गौरव करताना या तालुक्यातील दिग्गज व्यक्ती आपल्यामधून निघून गेल्या आहेत. आज जरी पक्ष वेगळे असले तरी राजेशजी बेंडल साहेब आपली विचार धारा एक आहे. राजेशजी बेंडल साहेब यांच्या पाठीशी आंम्ही ठामपणे उभे आहेत. २०२९ मध्ये गुहागर तालुक्याचा आमदार आंम्हाला राजेशजी बेंडल साहेबांच्या रुपाने पहायचा आहे असे स्पष्ट मत साहिल आरेकर यांनी व्यक्त केले

यावेळी विचारपिठावर अध्यक्षस्थानी पांडुरंग पाते, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल,ग्रामीण संघटनेचे उपाध्यक्ष तुकाराम निवाते,माजी अध्यक्ष रामचंद्र हुमणे गुरुजी,मुंबई शाखेचे सरचिटणीस कृष्णाजी वणे,ग्रामीण शाखेचे सरचिटणीस प्रदिप बेंडल, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष साहिल आरेकर, मुस्लिम समाजाचे महामुद कादीर बारमारे गुरुजी, महेश कातकर, माजी सभापती विलास वाघे,महादेव साटले, युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष मंगेश मते, अनंत पागडे, शंकर मोरे, गिरीश बारस्कर आदी. मान्यवर उपस्थित होते. यावेळी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाज संघटनेचे तालुका सचिव प्रदिप बेंडल यांनी केले.

 

#रामभाऊबेंडल #स्मृतिदिन #साहिलआरेकर #राष्ट्रवादीकाँग्रेस #गुहागर #सामाजिककार्य #राजकीयवारसा #महाराष्ट्र #कुणबीसमाज
#RambhauBendal #Smrutidin #SahilArekar #NCP #Guhagar #SocialWork #PoliticalLegacy #Maharashtra #KunbiSamaj

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न कॉलेजमधल्या जुन्या आठवणींना उजाळा आणि पुनर्भेटीला कटिबद्ध आबलोली (संदेश कदम) निसर्गरम्य परिसर,...
Read More
गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

*साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार "दिनकर सन्मान" सोहळा उत्साहात संपन्न   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा...
Read More
साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

*अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): दहावीच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर...
Read More
अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतून रस्ता पूर्ण; लवकरच डांबरीकरणासाठी निधी देणार...
Read More
मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा!- वैभव नाईक    रविंद्र चव्हाण...
Read More
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन   *प्रबोधनपर व्याख्याने, सत्कार सोहळा...
Read More
खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी,  महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी

■ ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी....।* ■ समिर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर:- तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी अधिकारी...
Read More
ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी