धाऊलवल्ली शाळा नंबर 1 विद्यार्थिनींचे राजापूर शिष्यवृत्ती अभियान मध्ये उज्वल यश
कु. प्रिया काळे (सुवर्णपदक) तर
कु. काव्या कल्पेश तोस्कर (ब्रांझपदक)च्या मानकरी
राजापूर – संदीप शेमणकर
प्रतीवर्षी प्रमाणे पंचायत समिती राजापूर “शिष्यवृत्ती अभियान’ अंतर्गत शिष्यवृत्तीत
तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा राजापूर, लांजा, साखरपा मतदार संघाचे आमदार किरण (भैया) सामंत यांच्या मार्गदर्शनाने राजापूर स्काॕलरशीप मिशन मध्ये तालुक्यातील धाऊलवल्ली शाळा नं.१ शाळेतील कुमारी प्रिया काळे (सुवर्णपदक, रोख रु. 1000/-व सर्टिफिकेट ची मानकरी ठरली.
तसेच कुमारी काव्या कल्पेश तोस्कर (ब्रांझपदक, रोख रु. 1000/-व सर्टिफिकेट ची मानकरी ठरली.) या उज्वल यशा मध्ये शाळेतील शिक्षक वृंदांची अथक मेहनत, विद्यार्थिनींची मेहनत, पाल्यांचा भरभरून प्रतिसाद यामुळेच विद्यार्थ्यांना उज्वल यशाचे शिखर गाठता आले.
या दोघांचे प्रशाला, तसेच पालक वर्ग आणि ग्रामस्थांकडून, व विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
















