उद्या  ६  ऑंगस्त  रोजी  हेदवतडमध्ये आमदार भास्करशेठ जाधव यांची तोफ धडाडणार!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🟠उद्या  ६  ऑंगस्त  रोजी  हेदवतडमध्ये आमदार भास्करशेठ जाधव यांची तोफ धडाडणार!

 

🔥 “चार गेले, पण चाळीस निर्माण करतो!” – शिंदेंच्या मेळाव्याचा विक्रम मोडण्याचा आत्मविश्वास

आबलोली (प्रतिनिधी: संदेश कदम) – गुहागर तालुक्यातील हेदवतड येथे येणाऱ्या ६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता गुहागरचे कार्यसम्राट आमदार भास्करशेठ जाधव यांचा भव्य जाहीर मेळावा होणार आहे. विशेष म्हणजे, हाच तो ठिकाण आहे जिथे काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा मेळावा पार पडला होता.

आता त्या ऐतिहासिक ठिकाणीच भास्करशेठ पुन्हा एकदा आपली राजकीय ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. या मेळाव्याला घेऊन संपूर्ण तालुक्यात, विशेषतः शिवसेना (UBT) कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

आमच्या प्रतिनिधींशी बोलताना आ. भास्कर जाधव यांनी रोखठोक शब्दांत विरोधकांना टोला लगावत म्हटलं,

“माझ्या पक्षातील चार कार्यकर्ते गेले असले, तरी चाळीस नवीन निर्माण करण्याची ताकद माझ्यात आहे. हे मी कृतीतून दाखवणार आहे. ६ तारखेला या, आणि स्वतः अनुभवा की जनसमुदाय कुणाबरोबर आहे.”

 

या विधानाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, शिंदेंच्या मेळाव्याचा विक्रम मोडण्याचा निर्धार भास्करशेठ जाधव यांनी स्पष्टपणे दाखवून दिला आहे. त्यामुळे गुहागर तालुक्यातील राजकीय समीकरणं बदलणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

 

📌 हॅशटॅग्स

#भास्करशेठजाधव #गुहागर #हेदवतड #शिंदेवरतोफ #राजकीयसामना #ShivSenaUBT #EknathShinde #RatnagiriPolitics #गुहागरचे_सामर्थ्य

📸 फोटो

 

 

 

 

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...