🌿 राखीचा सण आणि वृक्षसंवर्धनाचा संगम!
जि.प.शाळा पूर्णगड नं.१ मध्ये ‘रक्षाबंधन’ व ‘एक राखी वृक्षासाठी’ उपक्रम उत्साहात

रत्नागिरी : जि.प.शाळा पूर्णगड नं.१ (ता. जि. रत्नागिरी) येथे रक्षाबंधनाच्या निमित्ताने पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला. कार्यअनुभव उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या पर्यावरणपूरक राख्या वापरून भाव-बहिणींचा सण साजरा करण्यात आला. त्याचबरोबर **‘इको क्लब फॉर मिशन लाईफ’**च्या माध्यमातून एक राखी वृक्षासाठी हा आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला.
उपक्रमात वृक्षाचे पूजन करून त्याला राखी बांधण्यात आली व “झाडे लावा, झाडे जगवा, त्यांचे रक्षण करा” हा संदेश देण्यात आला. शाळेत राबवलेला हा उपक्रम नेहमीप्रमाणेच नाविन्यपूर्ण ठरला.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच केंद्रप्रमुख संजय राणे, शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केले.
—
#हॅशटॅग्स :
#रत्नागिरी #पूर्णगडशाळा #रक्षाबंधन #पर्यावरणपूरकउपक्रम #एकराखीवृक्षासाठी #झाडेलावा_झाडेजगवा #EcoClub #MissionLife
📷 फोटो















