शिवसेना पक्ष-चिन्ह वादाची सुनावणी ठरली; 8 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात निर्णायक सामना!

शिवसेना पक्ष-चिन्ह वादाची सुनावणी ठरली; 8 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात निर्णायक सामना!

 

घटनापीठाची 19 ऑगस्टपासून सुनावणी, न्यायमूर्ती सूर्यकांतांच्या खंडपीठासमोरच होणार अंतिम फैसला

 

मुंबई – शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्हाच्या मालकीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात अखेर सुनावणीची तारीख निश्चित झाली आहे. संगणक प्रणालीत नव्याने नोंदवलेल्या तारखेनुसार 8 ऑक्टोबरला हा निर्णायक सुनावणी दिवस असणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच हा अंतिम फैसला होणार आहे.

 

राष्ट्रपती आणि राज्यपाल वादावरील सल्ल्याच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठ स्थापन केले असून, ही सुनावणी 19 ऑगस्टपासून 10 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी या प्रकरणाला दोन वर्षे उलटली असल्याने लवकरात लवकर निकाल देण्याचा इशारा पूर्वीच दिला होता.

 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निकाल राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान, मार्मिकच्या 65 व्या वर्धापनदिनी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीशांना विनंती करत, “देशातील लोकशाही तडफडत आहे, वेळेवर न्याय न मिळाल्यास ती मरेल,” असे स्पष्ट शब्दात सांगितले.

 

🏷️ हॅशटॅग्स :

#ShivSena #SupremeCourt #PoliticalNews #UddhavThackeray #ShivSenaSymbol #Marmik #MaharashtraPolitics

 

📸 फोटो

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें