आदिवासी कातकरी समाजास स्‍नेहबंध मंच तर्फे कपडे वाटप 

आदिवासी कातकरी समाजास स्‍नेहबंध मंच तर्फे कपडे वाटप 

 

चिपळूण (वार्ताहर)~ योगेश पेढांबकर

स्‍नेहबंध मंच चिपळूण या सामाजिक संस्‍थेमार्फत कुंभार्ली कातकर वाडीतील एकूण ९ कुटुंबास साडया, पॅण्‍ट, शर्ट, बेडसिट, टॉवेल, चादरी, सतरंज्‍या, स्‍वेटर, असे सुमारे १०० ते १२० नगाचे वाटप करण्‍यात आले. सदर कार्यक्रम स्‍नेहबंध मंच चे अध्‍यक्ष सिताराम शिंदे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली तर कुंभार्ली ग्रामपंचायतीचे सरपंच रविंद्र सकपाळ यांच्‍या प्रमुख उपस्थितीत संपन्‍न झाला. सदर समारंभास उपसरपंच संदिप कोलगे, कातकरी समाजाचे वाडीप्रमुख मंगेश हिलम. ग्रामपंचायत सदस्‍य दिपक जाधव, स्‍नेहबंध मंचचे सचिव विकास ढवण, सदस्‍य विजय थोरे , अरुण कदम, नसरीम खडस, नारायण खेडेकर, कुंभार्ली शाळेचे मुख्‍याध्‍यापक संजय सोनवणे, सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थी इत्‍यादी उपस्थित होते.

स्‍नेहबंध मंचने या वर्षात आजपर्यंत एकूण १४ सामाजिक उपक्रम राबविले आहेत. ते असे घरेलू महिला कामगार यांची मोफत आरोग्‍य तपासणी व रक्‍तगट तपासणी, लिलाबाई आधार आश्रम गाने कळकवणे येथे फळे व पुस्‍तके वाटप, शिरळ येथील वाचनालयास पुस्‍तके वाटप, शाळा वडार कॉलनी, चिंचघरी व खेर्डी देऊळवाडी या शाळांतील मुलांना वहया वाटप, शालेय वाचनालयास पुस्‍तके वाटप , जागतिक महिलादिनी कर्तृत्‍ववान महिलांचा सन्‍मानपत्र देऊन गौरव केला. महाराष्‍ट्र दिन १ मे कामगार दिनी महिला घरेलू कामगारांना टिफीन बॉक्‍स वाटप, लिलाबाई आधार आश्रम कळकवणे येथे कायमस्‍वरुपी दोन वर्तमानपत्र सुरू करून दिली. असे अनेक उपक्रम राबविले आहेत. व राबवित आहेत. यासर्व उपक्रमाबाबत सरपंच रविंद्र सकपाळ, उपसरपंच संदिप कोलगे यांनी कौतुक करून मंचला धन्‍यवाद दिले. तर विजय थोरे , नसरीन खडस , नारायण खेडेकर, विकास ढवण, अरुण कदम यांनी आजपर्यंच्‍या कामाचा आढावा घेऊन यापुढे ही संस्‍था असे सतत उपक्रम राबविणार आहेत. विशेष बाब म्‍हणजे ही संस्‍था संचालकांच्‍या वर्गणीतूनच हे उपक्रम राबवित आहे. अन्‍य कोणाकडूनही मदत घेतली जात नाही. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून ही संस्‍था काम करीत आहे. या संस्‍थेचे संचालक चंद्रकांत कुलकर्णी , प्रकाश सावर्डेकर , अमिता मोमीन, नम्रता आग्रे,डॉ. राधा मोरे , डॉ. श्रध्‍दा जाधव, पांडुरंग लकडे , विजय थोरे, विकास ढवण, नसरीन खडस, अरुण कदम, नारायण खेडेकर, व सल्‍लागार विनायक घटे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे असे अध्‍यक्ष सिताराम शिंदे यांनी आपल्‍या भाषणात सांगितले शेवटी मुख्‍याध्‍यापक संजय सोनवणे यांनी आभार मानले व कार्यक्रम संपन्‍न झाला.

 

अध्यक्ष –

– श्री. सिताराम शिंदे . अध्‍यक्ष स्‍नेहबंध मंच चिपळूण

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें