कै.सौ.आनंदीबाई कृष्णाजी गोखले माध्यमिक विद्यालय,धाऊलवल्ली येथे आदरणीय संस्थापक कै.श्री. आर.के.गोखले यांचा स्मृतिदिन संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कै.सौ.आनंदीबाई कृष्णाजी गोखले माध्यमिक विद्यालय,धाऊलवल्ली येथे आदरणीय संस्थापक कै.श्री. आर.के.गोखले यांचा स्मृतिदिन संपन्न

राजापूर – संदीप शेमणकर

कै.सौ.आनंदीबाई कृष्णाजी गोखले माध्यमिक

विद्यालय,धाऊलवल्लीचे संस्थापक व माजी अध्यक्ष कै.श्री.आर.के.गोखले ऊर्फ रामभाऊ काका गोखले यांचा

16 ऑगस्ट या दिवशी स्मृतिदिन दरवर्षी मोठ्या श्रध्देने साजरा केला जातो.यावर्षी ही तो मोठ्या श्रध्देने साजरा करण्यात आला.

प्रथम प्रशालेच्या प्रांगणात असलेल्या संस्थापकांच्या पुतळ्यास त्यांचे सुपुत्र व आजी अध्यक्ष एस.आर. गोखले व नातू निनादजी गोखले तसेच चेअरमन के.पी.गोखले,सचिव रमेशजी पाडेकर,मुख्याध्यापिका श्रीम.हरचकर मॅडम यांच्या हस्ते धुप-दीप प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.त्यानंतर उपस्थित कमिटी सदस्य,पालक,ग्रामस्थ,शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी वर्ग,समस्त विद्यार्थी वर्ग यांनी संस्थापकांचरणी नतमस्तक होऊन सभागृहा मध्ये भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

व्यासपिठावर उपस्थित मान्यवरांमधील माजी विद्यार्थी श्री.भरतजी आपटे यांनी त्यांच्या प्रशालेतील विद्यार्थी जीवनातील संस्थापकांशी झालेला प्रत्यक्ष संवाद व त्या संवादातून संस्थापकांची शाळा स्थापने पासून ते गावाचा विकास यामध्ये त्यांची किती कळकळीची भावना होती. ही त्यांनी आपल्या स्वानुभवातून व्यक्त केली.

व्यासपिठावर उपस्थित असलेले माजी कमिटी सदस्य व माजी विद्यार्थी कमलेश सुरेश आंबेलकर यांनी ही आपल्या भाषणातून मा.संस्थापक यांच्या अमूल्य कार्याचे कौतुक व्यक्त करून आपण हा वारसा पुढे असाच चालू ठेवला पाहिजे असे आपले मत व्यक्त केले.

त्यानंतर कमिटी सदस्य संजयजी गोरे सर यांनीही संस्थापकांच्या अमूल्य कार्याविषयी व त्यांच्या अद्वितीय बुद्धिमत्ते विषयी सलाम करून अनेक आठवणी व्यक्त केल्या.

अध्यक्ष एस.आर.गोखले यांनी ही आपल्या भाषणातून आपले बालपण व समाज कार्यातून आपल्या वाट्यास आलेले आपले बाबा याविषयी खूपच भावस्पर्शी असे शब्द व्यक्त केले.त्यात ते म्हणाले की,आमचे बाबा कायमच शाळा,गावाचा विकास याच विचारांत मग्न असायचे.त्यांची खूप स्वप्ने होती आणि ती पूर्ण करण्यासाठी त्यांना नियतीने अजून वेळ द्यायला हवा होता.पण आपण सर्वांनी त्यांची राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांच्या कार्यात खारीचा वाटा उचलूयात असे मत व्यक्त केले.

चेअरमन के.पी.गोखले यांनी ही आपले मनोगत व्यक्त करतांना बरोबर आज 38 वर्षांनी पुन्हा तिथी नुसार आपल्या काकांचा स्मृस्तिदिन आल्याचे नमूद करून त्यांच्या कामकाजाची अमूल्य पद्धत व त्यांच्या शारिरीक क्षमतेपेक्षा ही त्यांची बौध्दिक क्षमता किती मोठी होती. याचे कौतुक करून त्यांच्या पश्चातही त्यांच्या कार्याचे त्यांचा ओळखीचे महत्त्व व्यक्त केले.

दरवर्षी या दिवशी महत्वपूर्ण असे व्याख्यान आयोजित केले जाते.तर यावर्षी निनादजी गोखले सर यांचे विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आयोजित केले होते.त्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या शिक्षणापासून ते IT क्षेत्रातील करिअर पर्यंतचे महत्वपूर्ण दाखले देत. व विद्यार्थ्यांशी संवाद साधत अतिशय मनमोकळ्या वातावरणात व सहज सोप्या भाषेत व्याख्यान दिले.

याच दिवशी पालक सभाही आयोजित केली जाते. व पालकांशी प्रत्यक्ष हितगुज केली जाते.पालकांशी विद्यार्थी व त्याचे शिक्षण याविषयी मुख्याध्यापिका समवेत चर्चा करण्यात आली .

कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन प्रशालेतील जेष्ठ शिक्षक प्रकाशजी कुंभार सर यांनी सुंदर शब्दात पार पाडले.सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.संजिवनी हळदणकर मॅडम यांनी सदर कार्याक्रमाचे उत्तम नियोजन केले. स्मृतिदिनाचा कार्यक्रम सोहळा प्रसंगी प्रशालेतील समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनीही मोलाचे सहकार्य करून प्रशालेतील हा वार्षिक महत्वपूर्ण व कृतज्ञतेचा सोहळा उत्साहात संपन्न झाला.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा