चिपळूण येथे रिपब्लिकन (आठवले) पक्षाची जिल्हा बैठक उत्साहात संपन्न

चिपळूण येथे रिपब्लिकन (आठवले) पक्षाची जिल्हा बैठक उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम)

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या राजकीय पक्षाची रत्नागिरी जिल्ह्याची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच चिपळूण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे जिल्हाध्यक्ष प्रीतमजी रुके यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली.

या बैठकीला जिल्हाध्यक्ष प्रीतमजी रुके, दलित मित्र पुरस्कार प्राप्त आणि राज्य कार्यकारणी सदस्य दादासाहेब मर्चंडे, पक्षाचे सरचिटणीस आणि नगरसेवक आदेशभाऊ मर्चंडे, कोकणी युवक अध्यक्ष सुशांतजी सकपाळ, जिल्हा उपाध्यक्ष आप्पा कदम, जिल्हा संघटक अजित तांबे, कोषाध्यक्ष गौतम तांबे, किरण पवार, ऍड.प्रशितोष कदम यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली खेड गुहागर चिपळूण संगमेश्वर रत्नागिरी लांजा राजापूर तालुक्यातील जिल्हा आणि तालुका पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

या बैठकीत 1) नवीन पक्ष सदस्यांची नोंदणी करणे या विषयावर चर्चा करण्यात आली 2) पक्ष सदस्य व पदाधिकारी यांची नोंदणी नूतनीकरण राबवण्यात येणार आहे. 3) दिनांक 03 ऑक्टोबर 2025 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाच्या महाड येथे होणाऱ्या वर्धापन दिन महोत्सव कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. 4) जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत तालुका निहाय आढावा घेण्यात आला व वेळप्रसंगी पक्षाच्या आदेशानुसार निवडणुका लढण्याचा निर्धार करण्यात आला. या बैठकीला रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका व जिल्हा अध्यक्षांनी आप – आपली भूमिका स्पष्ट करून रिपब्लिकन पक्ष संघटन बळकट करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रीतमजी रुके, दलित मित्र पुरस्कार प्राप्त आणि राज्य कार्यकारणी सदस्य दादासाहेब मर्चंडे, नगरसेवक आणि रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस आदेशभाऊ मर्चंडे यांनी मौलिक मार्गदर्शन केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें